ETV Bharat / city

Bappi Lahiri passes away : ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन - बप्पी लहरी लेटेस्ट न्यूज

Bappi Lahiri Passed away in Mumbai
संगीतकार गायक बप्पी लहरी यांचे मुंबईत निधन
author img

By

Published : Feb 16, 2022, 8:05 AM IST

Updated : Feb 16, 2022, 9:34 AM IST

08:03 February 16

ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन

मुंबई - ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांचे ( Bappi Lahiri Passes Away ) निधन झाले आहे. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते विविध आजारांनी ग्रस्त होते. निद्रानाशामुळे त्यांचे निधन ( Singer-composer Bappi Lahiri passes away at 69 ) झाल्याचे डॉक्टर दीपक नामजोशी सांगितले. आपल्या चाहत्यांमध्ये ते ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. त्यांनी 70-80च्या दशकात अनेक लोकप्रिय चित्रपटांना संगीत दिले. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली. तसेच 'डिस्को डान्सर' या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. तर भंकस नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ऐकायला मिळाले होते. आज त्यानी वयाच्या 69 वर्षी मुंबईत रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना झाल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लाहिरी आणि त्यांची मुलगी गायिका रेमा लाहिरी बन्सल असे कुटुंब आहे.

बप्पी लहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता. कलकत्ता येथे शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. वडील अपरेश लाहिरी हे प्रसिद्ध बंगाली गायक होते आणि त्यांची आई, बन्सरी लाहिरी संगीतकार आणि गायिका होत्या. त्या शास्त्रीय संगीत आणि श्यामा संगीतात पारंगत होत्या.

1973 मध्ये 'नन्हा शिकारी' या चित्रपटातून त्यांनी संगीतकार म्हणून पदापर्ण केले होते. 1976 मध्ये आलेल्या विशाल-आनंद यांच्या 'चलते-चलते' चित्रपटातून बप्पी दा यांना ओळख मिळाली. चित्रपट बॉक्सऑफिसवर तितकासा कमाई करु शकला नाही, पण चित्रपटातील गाणी मात्र गाजली त्यानंतर 1982 मध्ये आलेल्या मिथुन चक्रवती यांच्या 'डिस्को डान्सर' चित्रपटातील गाण्यांनी बप्पी दा यशशिखरावर पोहचले. बप्पी दा यांनी 'नमक हलाल', 'शराबी', 'हिम्मतवाला', 'साहेब', 'गुरु', 'घायल', 'रंगबाज', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'द डर्टी पिक्चर' यांसारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे. 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेल्या 'उ लाला' हे गाणंही चांगलंच लोकप्रिय ठरलं होतं. याशिवाय ते राजकारणात देखील उतरले होते. बप्पी यांनी 2014 साली भाजपाकडून पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.

बप्पी लहिरी इतकं सोनं का घालायचे?

बप्पी लहिरी यांचं नाव नेहमी दोन गोष्टींशी जोडण्यात आलं आहे. एक गाण्यातील वेगळेपण आणि दुसरं सोनं... बप्पी दांचं सोन्याप्रति असलेलं प्रेम सर्वांनाच माहितेय. इतकं सोनं का घालतात? या प्रश्नावर उत्तर देताना बप्पी लहरी यांनी सांगितलं, की, 'हॉलिवूडमध्ये एलविस प्रेस्ली सोन्याची चैन घालत असत. एलविस माझे अतिशय आवडते होते. मी नेहमी विचार करत होतो, जर मी जीवनात मोठं यश संपादन केलं, तर मी माझी एक वेगळी ओळख स्थापित करेन. देवाची कृपा आहे की मी इतकं सोनं घालू शकलो. सोनं माझ्यासाठी लकी असल्याचं' बप्पी दांनी सांगितलं होतं. पुरुषांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घालण्याची क्रेझ त्यांनीच आणली. त्यामुळे त्यांना 'गोल्ड मॅन'सुद्धा म्हटलं जातं.

हेही वाचा - The Great Freedom Fighter Tatya Tope : जाणून घ्या! नाना साहेबांचे उजवे हात असलेले स्वातंत्र्य सैनिक तात्या टोपे यांची वीरगाथा

Last Updated : Feb 16, 2022, 9:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.