ETV Bharat / city

संजय दत्तच्या घरी बाप्पा विराजमान.. 'बाप्पांवरचा विश्वास कायम, विघ्नहर्ता सर्वांना आरोग्य अन् आनंदाने आशीर्वाद देईल'

author img

By

Published : Aug 22, 2020, 5:14 PM IST

संजय दत्तने सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मान्यतासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याने एक सुंदर पोस्ट लिहिली असून बाप्पा सर्वांना आरोग्य आणि आनंदाने आशीर्वाद देईल, असा विश्वास त्याने व्यक्त केलाय.

Sanjay Dutt
संजय दत्त

मुंबई - गणे उत्सवाला सुरूवात झाल्यानंतर तमाम बॉलिवूड तारे-तारकांनी बाप्पा सोबतचे फोटो शेअर करीत चाहत्यांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय दत्तनेही पत्नी मान्यतासोबतचा एक उत्सवी फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर संजय दत्तने या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • The celebrations aren't as huge as they used to be every year but the faith in Bappa remains the same. I wish that this auspicious festival removes all the obstacles from our lives and bless us all with health and happiness. Ganpati Bappa Morya🙏🏻 pic.twitter.com/VDgMy86OKS

    — Sanjay Dutt (@duttsanjay) August 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ''दरवर्षी उत्सव साजरा करायचो तितका यावेळचा उत्सव विशाल नसला तरी बाप्पांवरचा विश्वास कायम आहे. माझी अशी इच्छा आहे की, हा शुभ सण आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करेल आणि आपल्या सर्वांना आरोग्य आणि आनंदाने आशीर्वाद देईल. गणपती बाप्पा मोरया.''

हेही वाचा - बॉलिवूड सिताऱ्यांचा गणेश उत्सव, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा...!!

यंदाचा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असल्यामुळे सगळीकडे साधेपणाने साजरा होतोय. मात्र संजय दत्तच्या बाबतीत याहून वेगळे कारण आहे. ८ ऑगस्टला त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या चाचणीमध्ये त्याच्या फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर तो अमेरिकेत जाऊन उपचार करेल अशी चर्चा होती. मात्र संजय दत्तने भारतातच उपचार घेण्याचे ठरवले आहे. मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्याने गणेश उत्सवाच्या काळात वरील पोस्ट लिहिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.