ETV Bharat / city

Sunil Maharaj Joined Shiv Sena: संजय राठोडांना हद्दपार करणार.. महंत सुनील महाराजांनी हाती बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरे जाणार पोहरादेवीला - banjara community mahant sunil maharaj

Sunil Maharaj Joined Shiv Sena: बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज Mahant Sunil Maharaj यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय राठोड यांना हद्दपार करणार हे जनतेने ठरवले आहे, असे महंत यावेळी म्हणाले.

Shiv Sena Sunil Maharaj
Shiv Sena Sunil Maharaj
author img

By

Published : Sep 30, 2022, 7:34 PM IST

मुंबई: Sunil Maharaj Joined Shiv Sena: शिवसेनेत मोठ्या प्रमाणात आउटगोइंग झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात अनेकजण शिवसैनिक प्रवेश करत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेत इन्कमिंग देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज पोहरादेवी येथील महंत सुनील महाराजांनी Mahant Sunil Maharaj त्यांच्या असंख्य बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन sunil maharaj joins shivsena uddhav thackeray बांधलं आहे. यावेळी त्यांनी आगामी काळात संपूर्ण समाज उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी एकत्र आणणार असल्याचे आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

संजय राठोड यांना हद्दपार करणार यावेळी बोलताना महंत सुनील महाराज म्हणाले की, आज पोहरादेवी येथे यात्रा आहे. तिथं 2 लाख भाविक आहेत, तो मुहूर्त साधून मी साहेबांना भेटायला आलो. अतिशय सकारात्मक चर्चा झाली. बंजारा समाजाला न्याय हे केवळ शिवसेना देऊ शकते, असा आमचा ठाम विश्वास आहे. त्यासाठी आम्ही खंबीरपणे त्यांच्या मागे आहोत. संजय राठोड यांच्या सोबत होतो, आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. त्यांना आम्ही दर्शनाला यावं, अशी विनंती केली. आम्ही शिवसंकल्प दौरा ठेवणार आहे. संजय राठोड यांना हद्दपार करणार हे जनतेने ठरवले आहे, असे महंत यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे पोहरादेवीला जाणार यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, साधू संत येती घरा, तो दिवाळी दसरा नवरात्रमध्ये सुनील महाराज आमच्यासोबत आले, याचा आनंद आहे. साहजिक आहे ते आमच्याकडे आलेत म्हणजे आता त्यांची जबाबदारी आमची आहे. महंतांनी मला पोहरादेवीला बोलावलं आहे. मी पोहरादेवीला नक्की जाईन. तिथून विदर्भ दौऱ्याला जाईल. तसं मी पूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. सर्वाना वाटतं होत कि शिवसेना संपली पण, जास्तीत जास्त लोक आमच्याकडे येत आहेत. लढाईच्या काळात सोबत येतात, त्यांना महत्व असतं, असे महंत सुनील महाराज यांनी यावेळी म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.