मुंबई - काँग्रेस आणि शिवसेने नेत्यांची आज वांद्र्यातील हॉटेल ट्रायडेंटमध्ये येथे बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे. तसेच आजची उद्धव ठाकरे यांची भेट ही सदिच्छा होती आणि आम्ही भेटलो आहोत, हेच सकारात्मक असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... शिवसेनेसोबत चर्चेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रत्येकी पाच नेत्यांची समिती गठीत
काही मुद्यांवर चर्चा होणे गरजेचे म्हणून भेट
सत्ता स्थापन करण्यापूर्वी काही मुद्यांवर चर्चा होणे गरजेचे म्हणून भेट घेत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार करू, असेही थोरात म्हणाले. राष्ट्रवादीने कॉमन मिनिमम प्रोग्रामसाठी समिती तयार केली आहे. आम्ही ही लवकर तयार करू असे थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा... 'भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट घेतला, आता 'नीळकंठ' होण्यास तयार'
शिवसेना आणि काँग्रेस दरम्यानच्या या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते सुभाष देसाई तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे उपस्थित होते.