ETV Bharat / city

Samruddhi Mahamarg : पूर्वांचल एक्सप्रेस वेच्या धर्तीवर महाराष्ट्र समृद्धी महामार्ग; प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण

पूर्वांचल एक्सप्रेस वेच्या (Purvanchal Expressway) धर्तीवर राज्याचा महत्वकांक्षी असलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) काम युद्ध पातळीवर सुरु असून आतपर्यंत ८० टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प २०२२ मध्ये पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे. कोरोनाच्या संकटामुळे काम मंदावले होते. मात्र आता या कामाला वेग आला असून आतपर्यंत ८० टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg
author img

By

Published : Nov 19, 2021, 8:13 PM IST

मुंबई - पूर्वांचल एक्सप्रेस वेच्या (Purvanchal Expressway) धर्तीवर राज्याचा महत्वकांक्षी असलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे (Balasaheb Thackeray Maharashtra samrudhi Highway) काम युद्ध पातळीवर सुरु असून आतपर्यंत ८० टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प २०२२ मध्ये पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे.

शिर्डीपर्यंत ५०० किलोमोटर लांबीचे काम जवळपास पूर्णत्वास -

देशातील सर्वाधिक मोठा आणि राज्याचा महत्वकांक्षी सुपरफास्ट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे (Balasaheb Thackeray Maharashtra samrudhi Highway) सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाच्या संकटामुळे काम मंदावले होते. मात्र आता या कामाला वेग आला असून आतपर्यंत ८० टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. जागा अधिग्रहणाची समस्या संपली आहे. शिर्डीपर्यंत ५०० किलोमोटर लांबीचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. यापूर्वी नागपूर ते मुंबई अंतर कापण्यास १२ ते १४ तासांचा अवधी लागत होते. मात्र आता या मार्गावरून नागपूर ते मुंबई अवघ्या ८ तासात गाठता येणार आहे. मुंबईच्या जेएनपीटी बंदरापर्यंत तो जाणार असल्याने अनेक उद्योग विदर्भात येतील. पूर्वी मुंबई, पुणे फारफार तर औरंगाबादच्या पुढे उद्योजक येत नव्हते. आता महामार्गामुळे विदर्भात व्यापार, व्यवसाय आणि आर्थिक भरभराट होईल, असे शिंदे म्हणाले. समृद्धी महामार्गावर सौर ऊर्जेद्वारे २५० मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार असून २० नवी स्थानके विकसित करण्यात येणार आहेत.

येत्या डिसेंबरपर्यंत मार्ग होणार खुला -

मुंबई ते नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिर्डीपर्यंतचा ५०० किलोमीटरचे अंतर येत्या डिसेंबर २०२१ अखेरी महामार्ग खुला करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. तर उर्वरित २०१ किलोमीटरचे अंतर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाचे काम ३० नोव्हेंबर २०१५ पासून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे आले होते. तेव्हापासून या मार्गाचे काम वेगात सुरू आहे. विक्रमी वेळेत जमीन अधिग्रहण यासह विविध कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे हा प्रकल्प सुद्धा अपेक्षित वेळेपूर्वीच करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे. या मुंबई ते नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होण्याची तारीख २०२० देण्यात आली आहे.

१४ तासांचे अंतर केवळ ८ तासांवर -

मुंबई ते नागपूर हे अंतर सद्यस्थितीत असलेल्या रस्ता मार्गाने सुमारे ८१२ किलोमीटर एवढे असून ते पार करण्यासाठी तब्बल १४ तास लागतात. मात्र समृद्धी महामार्गाने हे अंतर ७०० किलोमीटरवर येईल आणि प्रवाशी वाहनांना केवळ ८ तासांतच मुंबईहून नागपूरला पोहोचणे शक्य होईल. प्रवाशी वाहतुकीसाठी या महामार्गावर ताशी १५० वेगमर्यादा पाळणे बंधनकारक असेल. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथून मुंबई-नागपूरला जाणे केवळ ४ तासांत शक्य होणार आहे. एकूणच प्रवासी वाहतुकीसाठी हा महामार्ग वरदान तर ठरेलच शिवाय वेळेची मोठी बचत होईल.

55 हजार कोटी रुपये खर्च -

मुंबई ते नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा कामाला ५५ हजार कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. समृद्धी महामार्गाला १ हजार ६९० पूल उभारले जाणार आहेत. ६७२ पूल नागरिकांसाठी तर ८० भुयारी मार्ग प्राण्यांसाठी असणार आहे.

असा असेल समृद्धी महामार्ग-(Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg)

* नागपूर ते मुंबई 710 किमी पर्यंतचा महामार्ग

* एकूण 120 मीटर रुंदीचा हा रस्ता 6 पदरी असणार

* एकूण 10 जिल्हे , 27 तालुके आणि 392 गावातून महामार्ग जाणार

* नागपूर मुंबई हे अंतर फक्त 6 ते 7 तासात कापणे शक्य

* वाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकणार

* शंभर फुटांवर डिव्हायडर

* महामार्गाच्या सुरुवातीला आणि अखेरीस टोल नाके.

* जेवढा प्रवास करणारा तेवढा प्रति किलोमीटर मागे सव्वा रुपये प्रमाणे टोल आकाराला जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.