मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे, त्यांना सांभाळून घ्या. असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले होते. आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख होते. Mumbai Municipal Elections सुत्रे हाती घेतल्यापासून युवासेना वाढवत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन आणि पर्यावरण मंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. तसेच मुंबई विद्यापिठातील विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी प्रशासनापुढे मांडले आणि सोडविले.
भूमिगत टाक्या बांधण्याच्या संकल्पना 2011 साली ठाण्याजवळ असलेल्या जव्हार, मोखाडा येथील कुपोषणाचा आणि पाण्याचा मुद्दा त्यांनी उचलुन धरला होता. नाशिक जिल्ह्यातील पाण्यासाठी सुरु असलेल्या कसरतीचा व्हायरल फोटोची दखल घेत, तातडीने पूल उभारुन नागरिकांना दिलासा दिला होता. कोणत्याही विषयाची ते अभ्यासपूर्ण मांडणी करताना दिसतात. Balasaheb grandsons मुंबईतील नाईट लाईफ आणि ’रूफ टॉप हॉटेल, सुशोभिकरण, व्हर्टीकल गार्डन, सुशोभित सिग्नल यंत्रणा, मुसळधार पावसांचे पाणी साचून होणाऱ्या कोंडीवर उपाय करण्यासाठी भूमिगत टाक्या बांधण्याच्या संकल्पना आदित्य ठाकरे यांनी मांडल्या आहेत.
राज्यात महाविद्यालयांमध्ये त्यांनी विद्यार्थी संघटनेची बांधणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अमित ठाकरे हे नातू असून राज ठाकरे यांचे ते पूत्र आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे नेते तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेने पक्षाच्या विद्यार्थी शाखेची नव्याने बांधणी झाली. त्यानंतर मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. राज्यात महाविद्यालयांमध्ये त्यांनी विद्यार्थी संघटनेची बांधणी केली. त्यांनीही विद्यापीठातील तसेच राज्यातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम केले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून नवे नेतृत्व राज ठाकरेंनी उदयास आणत आहेत.
राज्यभर चांगला प्रतिसाद शिवसेनेला शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे मोठे खिंडार पडले आहे. या धक्क्यातून शिवसेनेला सावरण्याची धुरा आदित्य ठाकरे यांनी सांभाळली आहे. राज्यभर निष्ठा यात्रा काढून बंडखोरांविरूध्द ते रान उठवित आहेत. त्यांना राज्यभर चांगला प्रतिसादही मिळत आहे. तर दुसरीकडे राजकीय सत्तासंघर्षात आपली स्पेस निर्माण करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी मुंबईतील १०० प्रभागांचे मनसेने सर्वेक्षण सुरू केले आहे. अशातच शिवसेनेविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे उभे ठाकणार आहे.
पालिका निवडणुकांमध्ये हे दोन्ही नेते आमने सामने येणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य आणि अमित यांची पालिका निवडणुकीच्या मैदानात जोरदार एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर उदय झालेले हे दोन तरूण नेते आहेत, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर होणाऱ्या आगामी पालिका निवडणुकांमध्ये हे दोन्ही नेते आमने सामने येणार आहेत.
हेही वाचा - काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, २४ सप्टेंबरपासून सुरुवात, १७ ऑक्टोबरला मतदान