मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Extortion Case) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चांदीवाल आयोगाकडून ( Chandiwal commission scrapped warrant for Former Mumbai Commissioner ) जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. तर परमबीर सिंग आणि सचिन वाझे ( Sachin Vaze In 100 Crore Extortion Case ) तब्बल आठ महिन्यांनी आमने-सामने आले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh 100 Crore Extortion Case ) यांच्यावर 100 कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप केला होता. यानंतर राज्य सरकारकडून स्थापनकरण्यात आलेल्या चांदिवाल आयोगासमोर परमबीर सिंग यांना हजर राहण्याचे वारंवार आदेश देण्यात आले होते. मात्र, तरीही उपस्थित न झाल्याने चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. आज परमबीर सिंग आयोगासमोर हजर झाल्यानंतर 15 हजाराच्या रोख रकमेवर परमबीर सिंग यांचं अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आला आहे. तर तब्बल 8 महिन्यानंतर परमबीर सिंग आणि सचिन वाझे आज आयोगासमोर समोरा-समोर आले.
परमबीर सिंग यांना 15 हजारांचा दंड
अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाने या प्रकरणात सचिन वाझे तसेच संजय पालांडे यांचे जबाब नोंदवला आहे. मात्र, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना वारंवार चौकशीला बोलुन सुद्धा ते येत नव्हते. त्यानंतर आयोगाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. आज तो वारंट आयोगाने खारीज केला आणि गैरहजर राहिल्याबद्दल परमबीर सिंग यांना 15 हजारांचा दंड सुनावला. परमबीर सिंग यांना 15 हजार रुपये दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी, असे आदेश देण्यात आले आहे.
परमबीर सिंग यांनी या पहिलेच आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटले होते, की मला कुठल्याही प्रकारचे चौकशीला समोर जायचं नाही. माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नसल्यामुळे मी आयोगासमोर येऊ शकत नाही. त्यावेळी आयोगाने परमबीर सिंग यांच्या वकीलाला स्पष्ट स्वरुपात सांगितले होते, की परमबीर सिंग यांना आयोगासमोर हजर राहावं लागणार. त्यानंतर आज परमबीर सिंग हे सोमवारी आयोगासमोर हजर राहिले आहेत.
परमबीर सिंग सचिन वाझे आमने-सामने -
अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपात सचिन वाझे यांना देखील आयोगाने चौकशीला बोलवले होते. मात्र, आरोप लावल्यानंतर गायब झाल्यापासून परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे तब्बल 8 महिन्यानंतर समोरासमोर आयोगासमोर आले आहे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची आयोगासमोर समोर- समोर चौकशी देखील होणार आहे.
काय प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी ( 100 Crore Extortion Case ) रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.