मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या कारवाईत अटक आहेत. (Anil Deshmukh Bail Application) त्यांनी 27 जानेवारी रोजी मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाला असून अंतिम युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला होता. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखीव ठेवला होता. (Anil Deshmukh bail application) त्यावर आज मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार होते. (Anil Deshmukh bail hearing) मात्र, निर्णय लिहून पूर्ण न झाल्याचे स्पष्टीकरण देत न्यायालयाने निर्णय राखून ठेवलाआहे आता तो 14 मार्च रोजी दिला जाण्याची शक्यता आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने 1 नोव्हेंबर रोजी अटक केली
ईडीने आपल्या युक्तिवादात देशमुख यांना जामीन देण्यास विरोध केला आहे. देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रथम दर्शनीय आरोपी असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये. (Mumbai Sessions Court) जामीन दिल्यास या प्रकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे आसा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला आहे. जामिनासाठी अनिल देशमुख यांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, यापूर्वीचा देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन सेशन कोर्टने फेटाळला होता.
अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आले
12 तास चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने 1 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आले. 29 डिसेंबर रोजी ईडीने अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले. 20 मार्च 2021 ला मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळविण्यासाठी त्यांच्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयकडून प्राथमिक चौकशीचे आदेश दिले.
ऋषिकेश, सलील देशमुख यांना 5 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे न्यायालयाचा समन्स
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख, दुसरा मुलगा सलील देशमुख यांना न्यायालयाने 5 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर राहण्यास संदर्भात समन्स बजेवला आहे. ईडीने या दोघांना अनेक समन्स बजावून सुद्धा कार्यालयात चौकशीसाठी न आल्याचा ईडीने आरोप पत्रामध्ये म्हटले आहे. त्यानंतर सुनावणीवेळी न्यायालयाने या दोघांनाही 5 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा समन्स देण्यात आला आहे.
देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत
अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांच्याकडून विशेष पीएमएलए कोर्टात 27 जानेवारी रोजी अर्ज करण्यात आला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना 2 नोव्हेंबरला ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती.
अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र
100 कोटी कथित प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 90 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच, अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना देखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.
अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख, सलील देशमुख, आरती देशमुख सलील देशमुख, आरती देशमुख याला अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने या प्रकरणात वारंवार समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा कुटुंबिया हा चौकशीला हजर राहिला नाही. मात्र, याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.
हेही वाचा - Russia Ukraine War - 'रशियाला दहशतवादी देश घोषित करा'; अमेरिकेची रशियन तेल, गॅस आयतीवर बंदी