ETV Bharat / city

जागतिक हृदय दिनानिमित्त मुंबई पालिकेकडून जनजागृती व भ्रमणध्वनी सर्वेक्षण - Awareness and Mobile Survey by Mumbai Municipal Corporation

हृदयरोग व संबंधित आजारांकरीता महानगरपालिकेच्या वतीने, जागतिक आरोग्य संस्थेच्या सहयोगाने ‘डब्ल्यूएचओ स्टेप्स सर्वेक्षण’ सुरू करण्यात आले आहे. त्यात बृहन्मुंबई महानगरातील निवडक घरांमध्ये जाऊन माहिती घेण्यात येत आहे. या माहितीचा उपयोग करुन रुग्णांना पुरविण्यात येणार्‍या सेवांमध्ये सुधारणा करण्यात मदत मिळेल.

जागतिक हृदय दिन
जागतिक हृदय दिन
author img

By

Published : Sep 29, 2021, 1:22 AM IST

मुंबई - जागतिक हृदय दिनानिमित्त आजपासून हृदयरोग आणि त्याच्याशी संबंधित जोखमीच्या घटकांबाबत मुंबईकर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये असंसर्गजन्य आजार विषयक भ्रमणध्वनी सर्वेक्षण देखील केले जाणार आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने १८ वर्षे वयावरील निवडक नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण देखील सुरु करण्यात आले आहे.

जागतिक हृदय दिन
जागतिक हृदय दिन

हृदयरोगामुळे २९ टक्के मृत्यू -

हृदयरोग संबंधित आजार हे मृत्यूंचे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार भारतात या आजारांनी मृत्यू पावणार्‍या व्यक्तिंचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या २७ टक्के इतके आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यू नोंदणी आकडेवारीनुसार मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २०१९ मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी २९ टक्के इतके मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व पक्षघात या तीन आजारांमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तिंपैकी ६४.६ टक्के व्यक्ती असंसर्गजन्य आजाराने बाधित होते, असे निदर्शनास आले आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना हृदयरोग व पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास ते आपल्या जीवनशैलीत आवश्यक सकारात्मक बदल घडवू शकतात. परिणामी, हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते असे महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

असंसर्गजन्य आजार विषयक दूरध्वनीवरून सर्वेक्षण -

उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (असंसर्गजन्य रोग कक्ष) डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, असंसर्गजन्य आजार व त्याकरीता कारणीभूत जोखमीचे घटक यांचे मूल्यमापन करण्यासाठी जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून ‘असंसर्गजन्य आजार (Non Communicable Diseases) विषयक भ्रमणध्वनी सर्वेक्षण’ राबविण्यात येणार आहे. या मोहीमेदरम्यान नागरिकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला जाईल. त्यात आहार विषयक सवयी, मधुमेह, उच्च रक्तदाब, तंबाखूसेवन, मद्यपान यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातील. वय १८ वर्षे पूर्ण असणार्‍या व्यक्तिंना या सर्वेक्षणात सहभाग घेता येईल. मुंबईकर नागरिकांनी ८०००४००३०२१ या क्रमांकावरून आलेल्या दूरध्वनीला प्रतिसाद देऊन या आरोग्य सर्वेक्षणास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्टेप सर्वेक्षण -

हृदयरोग व संबंधित आजारांकरीता महानगरपालिकेच्या वतीने, जागतिक आरोग्य संस्थेच्या सहयोगाने ‘डब्ल्यूएचओ स्टेप्स सर्वेक्षण’ सुरू करण्यात आले आहे. त्यात बृहन्मुंबई महानगरातील निवडक घरांमध्ये जाऊन माहिती घेण्यात येत आहे. या माहितीचा उपयोग करुन रुग्णांना पुरविण्यात येणार्‍या सेवांमध्ये सुधारणा करण्यात मदत मिळेल. असंसर्गजन्य आजारांच्या जोखमीचे घटक अभ्यासण्यासाठी मुंबई महानगरातील वय वर्ष १८ वरील ५ हजार ९५० नागरिकांचे ३ टप्प्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. सहभाग घेतलेल्या नागरिकांना आरोग्यविषयक प्रश्न विचारणे, वजन, ऊंची व कमरेचा घेर तपासणे आणि रक्त व लघवी चाचणी करणे, अशा तीन टप्प्यांमध्ये हे सर्वेक्षण केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.