ETV Bharat / city

Auto Driver Death : चोर समजून ऑटोचालकाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू - शताब्दी हॉस्पिटल मुंबई

शाहरुखच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शाहरुखच्या कुटुंबाव्यतिरिक्त शेकडो स्थानिक रहिवाशांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. हातात शाहरुखच्या मारेकऱ्यांचे बॅनर पोस्टर घेऊन कुटुंबीय आयुक्तांकडे न्यायाची याचना करत होते.

ऑटोचालकाला बेदम मारहाण
ऑटोचालकाला बेदम मारहाण
author img

By

Published : Jan 24, 2022, 10:05 AM IST

Updated : Jan 24, 2022, 10:32 AM IST

मुंबई - समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दामू नगर येथील ऑटो चालक शाहरुख शेख याला काही गुंडांनी चोर समजून बेदम मारहाण ( Auto driver Beaten) केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शाहरुखला शताब्दी हॉस्पिटलमध्ये ( Shatabti Hospital Mumbai ) नेले आणि मेडिकल करून त्याला घरी पाठवले. दुसऱ्या दिवशी शाहरुखचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

चोर समजून ऑटोचालकाला बेदम मारहाण

शाहरुखच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शाहरुखच्या कुटुंबाव्यतिरिक्त शेकडो स्थानिक रहिवाशांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. हातात शाहरुखच्या मारेकऱ्यांचे बॅनर पोस्टर घेऊन कुटुंबीय आयुक्तांकडे न्यायाची याचना करत होते. काही वेळानंतर समता नगर पोलिसांनी ( Samata Nagar Police Thane ) त्यांना व्हॅनमध्ये बसवून पोलीस ठाण्यात आणले. शाहरुखच्या भावाने आरोप केला आहे की शाहरुखची हत्या करणारे दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक आहेत. त्यामुळे समता नगर पोलीस शाहरुखच्या मारेकऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवत नाहीत. धरणे आंदोलनाच्या वेळी तेथील डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी शाहरुखच्या कुटुंबीयांना सांगितले की, शाहरुखचे पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक तपासणीत जे काही समोर येईल, तेच गुन्हेगारांवर पुढील कारवाई केली जाईल.

Last Updated : Jan 24, 2022, 10:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.