ETV Bharat / city

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई महापालिका मुख्यालयावर आकर्षक तिरंगी रोषणाई

author img

By

Published : Aug 14, 2020, 10:26 PM IST

Updated : Aug 15, 2020, 12:21 AM IST

दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. यावर्षी देखील स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अशीच आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

Attractive lighting on Mumbai Municipal Corporation Headquarters on backdrop of Independence Day

मुंबई - दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. यावर्षी देखील स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अशीच आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईमुळे भारतीय तिरंगा झेंड्यांच्या रंगात महापालिका मुख्यालयाची इमारत न्हाऊन निघाल्याचे दिसत आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयावर आकर्षक रोषणाई

तत्कालीन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने मुंबई महापालिका मुख्यालयासाठी ६६००.६५ चौरस जमीन दिली होती. व्हिक्टोरिया टर्मिनससमोर मुंबई इलाख्याचे तत्कालीन गर्व्हनर विल्यम हॉर्नबी आणि बॉम्बे इंजिनीअर्सचे कर्नल जे. डी. क्रुकशांक यांच्या स्मरणार्थ नावे दिलेल्या रस्त्याच्या त्रिकोणी जागेत ही इमारत उभारण्यात आली आहे. आता या रस्त्यांना दादाभाई नौरोजी मार्ग व महापालिका मार्ग, अशी नावे देण्यात आली आहेत.

२५ एप्रिल १८८९ रोजी इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि २९ जुलै १८९३ रोजी पूर्ण झाले. बांधकाम सुरू झाले तेव्हा ग्रॅटन गॅरी हे पालिकेचे अध्यक्ष तर तत्कालीन आयसीएस अधिकारी एडवर्ड चार्लस केयन ऑलिव्हंट हे पालिकेचे आयुक्त होते. बांधकाम पूर्ण झाले तेव्हा १८९३मध्ये थॉमस ब्लॅनी हे पालिका अध्यक्ष तर ए. अॅक्वर्थ हे पालिकेचे आयुक्त होते. इमारत बांधकामाचा अंदाजित खर्च होता ११ लाख ८८ हजार ८२ रुपये. मात्र, प्रत्यक्षात खर्च आला ११ लाख १९ हजार ९६९ रुपये. कंत्राटदाराने चक्क ६८,११३ रुपयांची बचत केली.

आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस व तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनसचा आराखडा तयार करणाऱ्या फ्रेड्रिक विल्यम स्टीव्हन या आर्किटेक्टने इमारतीचे आराखडे तयार केले. तर प्रभारी निवासी अभियंता रावसाहेब सीताराम खंडेराव यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झाले. ही इमारत गॉथिक वास्तुशास्त्र पद्धतीने बांधण्यात आली असून या रचनेत पाश्चात्य व पौर्वात्य स्थापत्य कलेचा संगम आहे. ब्रिटिशांनी मुंबईत बांधलेल्या अनेक इमारती या उलट्या ‘सी’ आद्याक्षरासारखा किंवा चंद्रकोर आकाराच्या असल्या तरी पालिकेची इमारत मात्र त्रिकोणी आकारात आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार त्रिकोणी आकारात ही इमारत बांधण्यात आली आहे.

मुख्यालयाची मूळ हेरिटेज इमारत दोन मजल्यांची असून सुमारे २३५ फूट उंचीचा मनोरा आहे. या वास्तूचे बांधकाम कलात्मक नजाकतीने करण्यात आले आहे. इमारतीत ठिकठिकाणी सिंह, वास्तुदेवतांची शिल्पे आहेत. इमारतीचे बहुतेक बांधकाम दगडी असून इमारतीतील नक्षीकाम व कलाकुसर पाहण्यासारखी आहे. सजावटीसाठी नक्षीकाम केलेल्या रंगबिरंगी काचांचा वापर करण्यात आला आहे.

Last Updated : Aug 15, 2020, 12:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.