ETV Bharat / city

Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आजही एटीएस अधिकारी न्यायालयात अनुपस्थित

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ( Malegaon Blast Case ) राज्य सरकारकडून या प्रकरणाचे तपास केलेले अधिकारी कुलकर्णी यांच्यासह एटीएस अधिकारी यांना दैनंदिन सुनावणी उपस्थित राहण्याचे आदेश राज्य सरकारकडून ( State Government Order To ATS Officer To Present In Court ) देण्यात आले होते. आज होणाऱ्या सुनावणीदरम्यान लेखी अर्ज घेऊन येणार असल्याचे त्यावेळी एटीएस अधिकार्‍याने न्यायालयाला सांगितले होते. मात्र, आजदेखील एटीएस अधिकारी अनुपस्थित राहिले आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Jan 31, 2022, 7:29 PM IST

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ( Malegaon Blast Case ) राज्य सरकारकडून या प्रकरणाचे तपास केलेले अधिकारी कुलकर्णी यांच्यासह एटीएस अधिकारी यांना दैनंदिन सुनावणी उपस्थित राहण्याचे आदेश राज्य सरकारकडून ( State Government Order To ATS Officer To Present In Court ) देण्यात आले होते. मागील सुनावणीवेळी कोर्टात आलेले एटीएस अधिकाऱ्यांना आरोपी वकिलांकडून विरोध दर्शविल्यानंतर त्यांच्यावर कोर्टातून जाण्याची नामुष्की ली होती. त्यानंतर आज होणाऱ्या सुनावणीदरम्यान लेखी अर्ज घेऊन येणार असल्याचे त्यावेळी एटीएस अधिकार्‍याने न्यायालयाला सांगितले होते. मात्र, आजदेखील एटीएस अधिकारी अनुपस्थित राहिले आहे.

न्यायालय उद्यापर्यंत तहकूब -

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेले सुधाकर चतुर्वेदी यांची साक्ष आज न्यायालयासमोर घेण्यात आली. त्यावेळी अनेक मुद्द्यांवर ही साक्ष आज घेण्यात आली. उद्या पुन्हा या साक्षीदारांची साक्ष होणार असून उद्यापर्यंत कोर्ट तहकूब करण्यात आले आहे. उद्या एटीएस अधिकारी पत्र घेऊन येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2008मध्ये झाला होता बॉम्बस्फोट -

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर याही या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Minister Uday Samant on Exam : ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे - उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.