ETV Bharat / city

Ashvini Bhide MD Of Metro: अश्विनी भिडेंची वर्णी मेट्रोत, परदेशी सांभाळणार उपमुख्यमंत्री विभाग - Ashvini Bhide Managing Director Of Metro

मेट्रोचा कारभार अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर, श्रीकर परदेशी ( Shrikar Pardeshi ) यांना उपमुख्यमंत्री खात्याच्या सचिव पदावर विराजमान केले आहे. रखडलेला आरे कारशेडचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भिडे यांची वर्णी ( Ashvini Bhide Director Of Metro ) लावून शिवसेनेला हादरा दिला आहे.

Ashvini Bhide MD Of Metro
अश्विनी भिडेंची वर्णी मेट्रोत
author img

By

Published : Jul 14, 2022, 10:55 AM IST

मुंबई - आरे कारशेडवरून वादाला ( Metro Car Shed Issue ) तोंड फुटले असताना आता मेट्रोचा कारभार अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर श्रीकर परदेशी ( Shrikar Pardeshi ) यांना उपमुख्यमंत्री खात्याच्या सचिव पदावर विराजमान केले आहे. रखडलेला आरे कारशेडचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भिडे यांची वर्णी ( Ashvini Bhide Managing Director Of Metro ) लावून शिवसेनेला हादरा ( Shock to Shiv Sena ) दिला आहे.

पुन्हा एकदा भिडे यांची वर्णी - फडणवीस सरकारच्या ( Fadnavis Government ) काळात मुंबई मेट्रोच्या कामाची जबाबदारी अश्विनी भिडे यांच्याकडे दिली होती. शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्द्यावरून मतभेद झाले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi Government )सत्तेवर येताच भिडे यांची बदली करण्यात आली. कोरोना व्यवस्थापन आणि मुंबई महापालिका ( Mumbai Municipal Corporation ) अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती त्यांची नेमणूक केली होती. मात्र राज्यात नव्याने सत्तांतर होताच त्या पुन्हा एकदा भिडे यांची वर्णी मेट्रोमध्ये लावण्यात आली आहे.

श्रीनिवासन यांना डच्चू - यापूर्वी एस.व्ही.आर. श्रीनिवास ( S.V.R. Srinivasa ) यांच्याकडे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकपद ( Managing Director of Metro ) सोपवले होते. यावरून श्रीनिवासन यांना डच्चू देण्यात आला आहे. श्रीनिवास हे शिवसेनेच्या अत्यंत जवळचे अधिकारी मानले जातात. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवसेनेने सत्तेत येताच त्यांच्याकडे सूत्रे सोपवली होती. मात्र, शिंदे - भाजप सत्तेत येताच त्यांना डच्चू देत अश्विनी भिडे यांची वर्णी लावली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना हा मोठा झटका मानला जातो.

चार सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती - राज्य शासनाने चार सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मेट्रोची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे ( Additional Commissioner Ashvini Bhide ) यांच्याकडे पुन्हा सोपवली आहे. तर पंतप्रधान कार्यालय आणि विदेशात प्रशिक्षण घेऊन राज्याच्या सेवेत परतलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव या पदावर नियुक्ती केली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची तर उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अजिज शेख यांची बदली केली आहे.

हेही वाचा -Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा, आज 'या' ठिकाणी रेड अलर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.