ETV Bharat / city

...हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? - आशिष शेलार

author img

By

Published : Jul 19, 2021, 7:41 PM IST

भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही. गेल्या पंचवीस वर्षात असे कधीच घडले नाही. त्यामुळे, हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? याबाबत तातडीने विचार होण्याची गरज आहे, अशी मागणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली.

Ashish Shelar
आशिष शेलार

मुंबई - भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही. गेल्या पंचवीस वर्षात असे कधीच घडले नाही. त्यामुळे, हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? याबाबत तातडीने विचार होण्याची गरज आहे, अशी मागणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली. शेलार आज माध्यमांशी बोलत होते. मुंबईत पावसामुळे होत असलेल्या बदलावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.

हेही वाचा - "बा पांडुरंगा, शेतशिवारात समृद्धी येऊ दे, कोरोनाचे संकट दूर कर" उपमुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

मुंबई धोकादायक उंबरठ्यावर

मुंबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झाले आहे. काल परवापासून मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचे दिसून येत आहे. मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते. समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर होता. लोकांच्या घरात पाणी गेले. याचा अर्थ काय? भांडूपच्या जलशुद्धीकरण केंद्रातही पाणी शिरले. 26 जुलैच्या पावसातही भांडूप शुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले नव्हते. त्यामुळे, हे संकेत आहेत. हे धोकादायक आहे, असेही शेलार म्हणाले.

तज्ज्ञांची बैठक बोलवा

मुंबईत या दोन घटना पहिल्यांदाच घडल्या. लोकप्रतिनिधी म्हणून गेली पंचवीस वर्षे काम करतो आहे. या कार्यकाळात असे कधी पाहिले नाही. यावेळी दिसणारे बदल हे धोकादायक वाटत आहेत. या घटना म्हणजे मुंबईवर येऊ घातलेल्या मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना? अशी भीती आशिष शेलार यांनी व्यक्त केली. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगरसेवक, आमदार, खासदार, पालिकेचे अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची बैठक बोलावून आढावा घ्यावा. नंतर हळहळ करण्यात अर्थ नाही, असेही शेलार म्हणाले. तसेच, ज्या अधिकाऱ्यांना हे धोके कळले नाहीत. त्यांचीच काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला आहे, अशी टीकाही शेलार यांनी केली.

नरबळीचा प्रस्ताव आणणार का?

मुंबईत एवढे सगळे अधिकारी असताना दुर्घटना झाल्याच कशा? असा सवाल करतानाच दुर्घटना झाल्यानंतर पालिकेत प्रस्ताव होतो. आता नरबळी घेतल्यावर विकासाचे प्रस्ताव करणार आहात का? असा संतप्त सवालही शेलार यांनी केला. हा राजकारण करायचा मुद्दा नाही. लोककारण करावे लागेल. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने 112 टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही 31 लोक दगावलीत. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही. तर हात सफाई आहे. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे, असे ते म्हणाले. मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग याचे महिन्याभरापूर्वी सर्वेक्षण करायला हवे होते. पण, पालिकेने हे सर्वेक्षण केले नाही. पालिका नागरिक, नगरसेवकांचे ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात आणून ठेवायचे आहे काय? असा सवाल शेलार यांनी उपस्थित करत शिवसेनेच्या पालिकेने हे करून ठेवले, अशी टीका केली.

हेही वाचा - शिवसेनेशी भांडून डोक्यावरची केसं गेली, चंद्रकांत पाटलांचा मिश्किल टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.