ETV Bharat / city

Ashish Shelar Tweet : 'टँकर माफियांकडून होणाऱ्या कोटींच्या दंड वसुलीला पालकमंत्र्यांची स्थगिती, पाणी इथेच मुरतेय' - अशिष शेलार*

समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी 18 हजार कोटी पाण्यात न घालता मुंबईत होणारी प्रचंड मोठी पाणी चोरी (Water laundering) , टँकर माफीया (Tanker Mafia) आणि त्यातून होणारी अंदाजे 3,000 कोटींची बेकायदेशीर अनियमित उलाढाल हेही एकदा तपासून पहा असे आशिष शेलार यांनी पत्र लिहून पालिका आयुक्तांच्या लक्षात आणून दिले होते.

ashish shelar
ashish shelar
author img

By

Published : Jan 21, 2022, 4:14 PM IST

मुंबई - मुंबईत पाण्याचा 'बाजार' करुन सुमारे 3 हजार कोटींचे बेकायदेशीर रॅकेट चालवले जात असून मुंबईकरांच्या पाण्याचा 'व्यापार' कसा सुरू आहे याकडे भाजप आमदार आशिष शेलार यांनी गंभीरतेने लक्ष वेधत पालिका आयुक्तांना याबाबत (Ashish Shelar sends Letter) पत्र पाठवले होते. परंतु आता आशिष शेलार यांनी नव्याने ट्विट करत टँकर माफिया होणाऱ्या 200 कोटीच्या दंड वसुलीला पालकमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे सांगत महापालिकेवर निशाणा साधला आहे.

हेच का तुमचे पर्यावरण प्रेम
समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी 18 हजार कोटी पाण्यात न घालता मुंबईत होणारी प्रचंड मोठी पाणी चोरी (Water laundering) , टँकर माफीया (Tanker Mafia) आणि त्यातून होणारी अंदाजे 3,000 कोटींची बेकायदेशीर अनियमित उलाढाल हेही एकदा तपासून पहा असे आशिष शेलार यांनी पत्र लिहून पालिका आयुक्तांच्या लक्षात आणून दिले होते. परंतु आता टँकर माफियांकडून होणाऱ्या 200 कोटींचा दंड वसुलीला पालकमंत्र्यांनी स्थगिती देऊन पाण्याच्या दहा हजार कोटीच्या लूटीला संरक्षण दिले, हेच का तुमचे पर्यावरण प्रेम? असा सवालही आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे. ‘18 हजार कोटी खर्च करून समुद्राचे पाणी गोडे करताना या पर्यावरण प्रेमाला सोयीस्कर आहोटी येते व इथेच मतलबाचे "पाणी" मुरते!’ असंही अशिष शेलार यांनी सांगितले आहे.

केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे लक्ष वेधले
मुंबईतील सुमारे दहा हजारपेक्षा जास्त विहिरीतून बेकायदेशीरपणे दोन हजार टँकर पाण्याचा उपसा करीत आहेत. दहा हजार कोटींची बेकायदेशीर उलाढाल सुरू आहे. दिवसाढवळ्या नैसर्गिक संपत्तीची लूट सुरू असल्याकडे केंद्रीय भूजल प्राधिकरणाने लक्ष वेधून या बाबत नियमावली नियमावली तयार करा असे सांगितले. परंतु याकडे दुर्लक्ष करून टँकर माफियांकडून होणाऱ्या 200 कोटींचा दंड वसुलीला पालकमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने आता हे प्रकरण नवीन वळणावर आले आहे.

मुंबईतील विहिरी व बोअरवेल
केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई शहरात 19,000 पेक्षा जास्त पाण्याच्या विहिरी आहेत. ज्यापैकी 12,500 बोअरवेल आहेत. मुंबई महानगरपालिकेने 251 जलकुंभांना नोटिसा बजावल्या असून त्यापैकी 216 अवैध जलविहिरी असून यातील एकाच जलकुंभातून 80 कोटी रुपयांची पाणीचोरी झाल्याचेही बाब काही प्रसिध्‍दी माध्‍यमांनी समोर आणली आहे.

हेही वाचा - Sharad Pawar Support Amol Kolhe : अमोल कोल्हे यांच्या नथुराम गोडसेच्या भूमिकेचे शरद पवार म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.