ETV Bharat / city

Ashish Shelar on Banerjee and Thackeray meet : शिवसेनेने महाराष्ट्र द्रोह केला - अशिष शेलार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांना भेटून राजशिष्टाचार शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Aditya Thackeray ) महाराष्ट्र द्रोह केल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

अशिष शेलार
अशिष शेलार
author img

By

Published : Dec 2, 2021, 3:49 PM IST

मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) या महाराष्ट्रात आल्या तेव्हा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) त्यांना भेटायला ( Mamata Banerjee and Aditya Thackeray Meet ) गेल्या होत्या. या भेटीत काय ठरले याचा तपशील त्यांनी दिला नाही. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेण्यासाठी त्यांना मदत केली का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रासोबत शिवसेनेने केलेला राज्यद्रोह आहे, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी केला आहे.

बोलताना आशिष शेलार

ममता यांच्यावर कारवाई करा

राष्ट्रगीताचा अपमान करणार्‍या ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रद्रोह केला आहे का याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. राष्ट्रगीत बसून म्हणणे हा राष्ट्रगीताचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी, अशी आमची मागणी असल्याचेही शेलार म्हणाले.

प्रियंका चतुर्वेदीला सावरकरांवर बोलण्याचा अधिकार काय..? - शेलार

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नुकतीच सावरकरांबद्दल वक्तव्य केले आहे. वास्तविक केवळ खासदारकीसाठी काँग्रेसमधून त्या शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये काहीही फरक पडलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनीही सावरकरांच्या विरोधात बोलणार्‍यांना जोडे मारले होते. त्यामुळे सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या चतुर्वेदींना भाजपच्या महिलांनी जोडे मारावेत का, असा सवालही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रत्येक राज्याला विकासाचा अधिकार - शेलार

प्रत्येक राज्याला स्वतःच्या विकासाचा अधिकार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आल्या, भूपेन पटेल आले किंवा योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले. तर त्याला आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. मात्र, ज्या पद्धतीने राजशिष्टाचार मंत्री जाऊन एखाद्या मुख्यमंत्र्यांची गुप्त चर्चा करतात त्याला आमचा विरोध आहे, असे शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.

परमबीर सिंह यांना सरकारनेच मदत केली - शेलार

परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई सरकार करत असेल तर तो सरकारचा प्रश्न आहे. मात्र, परमबीर सिंह कुठेही परागंदा झाले नव्हते ते भारतातच होते हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपनेत्यांना त्यांना पळवले हा आरोपही चुकीचा होता. उलट सरकारने त्यांना पळून जाण्यासाठी मदत केली का किंवा त्यांना मदत करणार आहे, का हा खरा प्रश्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे ही वाचा - Sanjay Raut Allegations On BJP : …तेव्हा यांना मिरच्या का झोंबल्या नाहीत; संजय राऊतांनी सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.