ETV Bharat / city

स्वतःच्या आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचे पाप माविआ करतंय, लोकशाहीवर विश्वास नाही? - आशिष शेलार - भाजप बैठक राज्यसभा निवडणूक

महाविकास आघाडी सरकारला आपल्या आमदारांवर ( Ashish Shelar comment on maha vikas aghadi mla ) भरवसा नाही का? आपल्याच आमदारांना नजरकैदेत ( Rajya sabha election Ashish Shelar comment ) ठेवण्याचे पाप महाविकास आघाडी करत आहे. महाविकास आघाडी सरकारला लोकशाहीवर विश्वास नाही का? असा टोला भारतीय जनता पक्षाचे ( bjp meating mumbai over rajya sabha election ) आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.

Ashish Shelar comment on maha vikas aghadi mla
भाजप बैठक राज्यसभा निवडणूक
author img

By

Published : Jun 5, 2022, 5:50 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारला आपल्या आमदारांवर ( Ashish Shelar comment on maha vikas aghadi mla ) भरवसा नाही का? आपल्याच आमदारांना नजरकैदेत ( Rajya sabha election Ashish Shelar comment ) ठेवण्याचे पाप महाविकास आघाडी करत आहे. महाविकास आघाडी सरकारला लोकशाहीवर विश्वास नाही का? असा टोला भारतीय जनता पक्षाचे ( bjp meating mumbai over rajya sabha election ) आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.

भाजपच्या बैठकीचे दृश्ये

हेही वाचा - थोडा तरी दिलासा मिळेल, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वारांगणांची प्रतिक्रिया

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आपले आमदार आणि सहयोगी अपक्ष आमदार यांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावरून आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास नाही का? असा टोला लगावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आज महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी राज्यसभा निवडणुकीचे प्रभारी अश्विन वैष्णव हे उपस्थित होते. यासोबतच उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ऑनलाइन माध्यमातून, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, नेत्या पंकजा मुंडे, आमदार प्रसाद लाड, आमदार संजय कुटे हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत दहा जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठीची रणनीती ठरवण्यात आली. तसेच, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासमोर कोणती आव्हाने आहेत, त्या आव्हानांबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी दिली. ही बैठक भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पार पडली.

तबेल्यात राहणार्‍यांना घोडेबाजार दिसतो - राज्यसभा निवडणुकीत आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप सातत्याने शिवसेना नेते संजय राऊत करत आहेत. मात्र, जे तबेल्यात राहतात त्यांना घोडेबाजार दिसतो. तबेला सोडून जर ते आपल्या घरी शांतपणे झोपले तर त्यांना घोडेबाजार दिसणार नाही, असा चिमटा आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना काढला.

सतेज पाटलांनी कोल्हापुरातले आमदार संभाळावे - राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातले आमदार आपल्या संपर्कात असल्याचे वक्तव्य मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात केले. मात्र, सतेज पाटील यांनी कोल्हापुरातले आपले आमदार संभाळावे, असा टोला आशिष शेलार यांनी सतेज पाटील यांना लगावला. तसेच, राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - BJP Mahila Morcha: भाजप महिला मोर्चाच्या अधिकाऱ्यांविरोधात दीपाली सय्यद यांची तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.