ETV Bharat / city

Ashish Shelar PC : 'मुंबईकरांना सुरक्षेची हमी देऊ शकत नसाल, तर आदित्य ठाकरेंनी माफी मागावी' - आशिष शेलार आदित्य ठाकरे टीका

प्रशासन जी आकडेवारी देत आहे, ती रतन खत्रीचे आकडे आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार ( Ashish Shelar On BMC Drainage Cleaning ) यांनी पालिका प्रशासनावर केला. 25 वर्षांच्या सत्तेनंतर मुंबईकरांना सुरक्षेची हमी ेऊ शकत नसतील तर आदित्य ठाकरे ( Ashish Shear Criticized Aditya Thackeray ) यांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

Ashish Shelar PC
Ashish Shelar PC
author img

By

Published : May 19, 2022, 8:17 PM IST

Updated : May 19, 2022, 8:30 PM IST

मुंबई - पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईतील नालेसफाईची कामे काटावर पास व्हावे एवढी 35 टक्केच झाली आहे. प्रशासन जी आकडेवारी देत आहे, ती रतन खत्रीचे आकडे आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार ( Ashish Shelar On BMC Drainage Cleaning ) यांनी पालिका प्रशासनावर केला. 25 वर्षांच्या सत्तेनंतर मुंबईकरांना सुरक्षेची हमी देऊ शकत नसतील तर आदित्य ठाकरे ( Ashish Shear Criticized Aditya Thackeray ) यांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

प्रतिक्रिया

मुंबईकरांसाठी रस्त्यावर का उतरत नाही? - अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या नगरसेवकांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा दुसऱ्या टप्प्यातील पाहणी दौरा आज केला. पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्ष नेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्यासह पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेऊन निवेदनासह मुंबईतील नाल्यांचा सचित्र अहवाल सादर केला. त्यानतंर शेलार यांनी पालिका मुख्यालयातील भाजपा पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, ज्या गोष्टी टाळता येऊ शकतात, पूर्ण होऊ शकतात, नियोजन होऊ शकते, अशा गोष्टी सुद्धा पालिका प्रशासन जाणून-बुजून करताना दिसत नाही. टाळाटाळ केली जाते आहे, हा कुठला कट आहे? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.

आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी - येत्या पावसाळ्यात मुंबईकर सुरक्षित असतील याची हमी देता येणार नाही, अशा आशयाचे विधान आदित्य ठाकरे यांनी केले त्यावर पत्रकारांंनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आमदार अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, मुंबईची 25 वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर जर आदित्य ठाकरे असे म्हणत असतील तर त्यांनी मुंबईकरांची माफी मागावी. मुंबईचा बाप कोण ? मुंबई कुणाची? अशी भाषणे करता, मग आता मुंबईकरांसाठी रस्त्यावर का उतरत नाही ? पंचतारांकित हाँटेलमधील बैठका, पार्ट्या सोडून कधीतरी रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष परिस्थितीची आदित्य ठाकरे पाहणी करणार आहेत का? असा सवाल शेलार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यापूर्वी बैठक घेतली त्या बैठकीत काय ठरले त्यानंतर कामाचे नियोजन का केले नाही? आता पाऊस तोंडावर आल्यावर पालकमंत्र्यांची धावपळ सुरू आहे एकूणच मुंबईकडे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष नाही मुंबईकर असुरक्षित आहेत, असे चित्र पाहायला मिळते आहे.

पालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार - आम्ही जेव्हा 7 एप्रिलला नालेसफाईची पाहणी करायला उतरलो त्यावेळी सत्ताधारी शिवसेनेकडून आमच्या या पाहणी दौऱ्यावर टीका करण्यात आली, मात्र ते स्वतः तेव्हाही फरार होते आणि आजही फरार आहेत. काल जेव्हा दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याचे नियोजन आम्ही सुरू केले त्यानंतर संध्याकाळी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी अंधारात जाऊन नालेसफाईची पाहणी केली. 'उजेडात होते पुण्य अंधारात पाप" या गाण्याच्या ओळीची आठवण करून देत हे कसले अंधारात पाप सुरू आहे? असा खोचक सवाल त्यांनी केला. आम्ही आज पालिका आयुक्तांना भेटणार असे कळताच पालकमंत्र्यांनी धावाधाव करून आयुक्तांना भेटून गेले. एवढे दिवस हे कोठे होते? असा सवालही शेलार यांनी केला. यावर्षी पावसाळ्यात मुंबईकर सुरक्षित नाहीत मुंबईकरांच्या मालमत्ता सुरक्षित नाहीत आणि याला जबाबदार महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

शिवसेनेचे पळ काढू धोरण जबाबदार - पावसाळ्यापूर्वी करावी लागणारी वृक्ष छाटणी अद्याप झालेली नाही, दरडी कोसळणे झाडं कोसळणे, मोडकळीस आलेल्या इमारती याबाबतचे नियोजन करण्यात आलेले नाही. आज याबाबत बैठक झाली, असे पालिका आयुक्तांनी सांगितले हे सर्व पाहता पालिका प्रशासनाचा निद्रानाश कसा होणार आणि कधी होणार? हाच एक प्रश्न आहे. मुंबईमध्ये पावसाळ्यात जी परिस्थिती उद्भवेल त्याला प्रशासनाची दिरंगाई आणि सत्ताधारी शिवसेनेचे पळ काढू धोरण जबाबदार असेल, असेही शेलार यांनी सांगितले. आज पालिका आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की, वृक्ष छाटणीबाबत पालिका आता उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणार आहे. जर पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष छाटणीची ट्रेनिंग होणार असेल, तर मग छाटणी कधी करणार? असा सवाल शेलार यांनी केला.

हेही वाचा - BMC TDR Scam : मुंबई महापालिकेत ९ हजार कोटींचा भूखंड टीडीआर घोटाळा, काँग्रेसचे लोकायुक्तांना पत्र

Last Updated : May 19, 2022, 8:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.