ETV Bharat / city

Mumbai Covid Quarantined Patients : मुंबईत दोन वर्षात तब्बल 1 कोटी नागरिक क्वारंटाईन

कोरोनाचा प्रादुर्भाव ( Covid Spread In Mumbai ) सुरु झाल्यासपासून गेल्या दोन वर्षात मुंबईत तब्बल १ कोटी नागरिकांना क्वारंटाईन ( One Crore Patients Quarantined In Mumbai ) करण्यात आले होते. मुंबईची लोकसंख्या ( Population Of Mumbai ) सुमारे ३ कोटी असून, त्याच्या ३० टक्के म्हणजेच ३० टक्के नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते.

author img

By

Published : May 5, 2022, 10:33 AM IST

Mumbai Covid Quarantine
मुंबईत दोन वर्षात तब्बल 1 कोटी नागरिक क्वारंटाईन

मुंबई - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार ( Covid Spread In Mumbai ) आहे. हा प्रसार रोखण्यासाठी रुग्णांवर उपचार करताना पालिकेने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही क्वारंटाईन केले. मुंबईत गेल्या दोन वर्षात तब्बल 1 कोटी 3 लाख 18 हजार 364 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले ( One Crore Patients Quarantined In Mumbai ) आहे. मुंबईत सुमारे 3 कोटी नागरिक ( Population Of Mumbai ) राहत असून त्यापैकी 30 टक्के नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रसार - मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर झपाट्याने रुग्णसंख्या वाढू लागली. गेल्या दोन वर्षात मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीन लाटा वेळीच रोखण्यात पालिकेला यश आले आहे. 2 मे पर्यंत एकूण 10 लाख 59 हजार 970 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून 19 हजार 563 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

1 कोटी 3 लाख क्वारेंटाईन - कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांची तापसणी करून त्यांना क्वारंटाईन केले जात आहेत. गेल्या दोन वर्षात एकूण 1 कोटी 3 लाख 25 हजार 887 नागरिकांना क्वारंटाईन केले आहे. त्यापैकी 60 लाख 37 हजार 829 हाय रिस्क तर 42 लाख 88 हजार 58 लो रिस्क कॉन्टॅक्ट आहेत. एकूण 1 कोटी 3 लाख 25 हजार 887 पैकी 1 कोटी 3 लाख 18 हजार 364 नागरिकांनी क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. तर 7 हजार 523 नागरिक अद्यापही होम क्वारंटाईन आहेत.

झोपडपट्ट्या, इमारती सील मुक्त - गेल्या दोन वर्षात मुंबईत कोरोना विषाणूच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. डिसेंबर 2021 ला मुंबईत तिसरी लाट आली. यावेळी 6 जानेवारीला 32 झोपडपट्टी आणि 508 इमारती सील होत्या. तिसरी लाट एकाच महिन्यात आटोक्यात आली. यामुळे 12 जानेवारीला एकही झोपडपट्टी सील नव्हती. यानंतर काही दिवसात इमारती सिलचे प्रमाणही शून्यावर आले Fआहे. सध्या रोजची रुग्णसंख्या 50 ते 100 च्या दरम्यान असल्याने एकही झोपडपट्टी किंवा इमारत सील नाही. मुंबईत आतापर्यंत एकूण 2798 झोपडपट्ट्या आणि चाळी तसेच 66 हजार 336 इमारती सीलमुक्त झाल्या आहेत.

10 लाख 60 हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग - मुंबईत आतापर्यंत एकूण १० लाख ६० हजार ०७० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३९ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६३७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८०७९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००८ टक्के इतका आहे. मुंबईत ९८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार ००९ बेड्स असून केवळ १५ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

७४ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ७४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा तर मे महिन्यात ३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

यामुळे प्रसार रोखण्यात यश - मुंबईत कोरोनाचा एखादा रुग्ण आढळून आला तर त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जाते. यात अति जोखीम म्हणजे हाय रिक्स आणि कमी जोखीम म्हणजे लो रिस्क अशी विभागणी करून क्वारेंटाईन केले जाते. यापैकी काहींना संस्थात्मक तर काहींना घरीच क्वारेंटाईन करण्यात आले. रुग्णाच्या संपर्कात आलेले लोकही पॉजिटीव्ह असू शकतात. त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. रुग्णाच्या संपर्कातील लोकांना क्वारेंटाईन केल्याने कोरोनाचा प्रसार रोखता येणे शक्य झाले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा : Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय; सलग दुसऱ्या दिवशी रुग्णवाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.