मुंबई - आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी (दि. 26 ऑक्टोबर)रोजी सुनावणी करणार आहे, असे त्याच्या वकिलाने स्पष्ट केले आहे. क्रूझ ड्रग केस प्रकरणी आर्य खान अटकेत असून काल बुधवार (दि. 20)रोजी मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालाय दाखल करणार असल्याची माहिती आर्यन खानचे वकील अली काशीद देशमुख यांनी दिली होती. त्यानुसार आता येत्या मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावनी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
निकाल राखून ठेवला होता
यामध्ये मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट यांचाही जामीन नामंजूर झाला आहे. यामुळे या तिघांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते.
शाहरुख खानने घेतली आर्यनची भेट
आर्यन खान गेल्या 19 दिवसांपासून तरुंगात आहे. काल मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नाकारला. त्यामुळे जामीन मिळू शकला नाही. आज त्याची कोठडी संपणार असल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी शाहरूख खानने आर्यन खानची आज सकाळी ऑर्थर रोड कारागृहात भेट घेतली आहे. शाहरूखला तीन आठवड्यांनी आर्यनला भेटण्याची परवानगी कारागृह प्रशासनाने दिली होती.
आर्यनला शाहरुख खान कडून मनी ऑर्डर
जेलमध्ये ११ ऑक्टोबरला आर्यन खानला साडे चार हजार रुपयांची मनी ऑर्डर आली आहे. आर्यनला हे पैसे त्याचे वडील म्हणजेच अभिनेता शाहरुख खानने पाठवले आहेत. मनी ऑर्डरने आलेल्या या पैशांचा वापर आर्यन कॅन्टीनमधील जेवणासाठी करु शकतो. तसेच, तुरुंगातील नियमांनुसार कैदींना पैसे हे फक्त मनी ऑर्डरने पाठवले जाऊ शकतात आणि त्यासाठी ४ हजार ५०० रुपये ही जास्तीत जास्त रक्कम आहे. तसेच, ही रक्कम महिन्यातून एकदाच पाठवता येते. त्यामुळे कोणत्याही कैदीचे घरचे याहून जास्त पैसे मनी ऑर्डरद्वारे पाठवू शकत नाही.
हेही वाचा - शाहरूख खानने आर्यनची तुरूंगात घेतली भेट; केवळ दहा मिनिटांचीच परवानगी