ETV Bharat / city

Cruise Drugs Party Case - आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी - Aryan Khan

मुंबई - क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांची आज एनसीबी कोठडी संपत असून, यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. आज किल्ला कोर्टात आर्यन खानला जामीन मिळणार की, कारागृहातील त्याचा मुक्काम वाढणार याचा फैसला आज होणार आहे.

Cruise Drugs Party Case - आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

author img

By

Published : Oct 7, 2021, 1:11 PM IST

मुंबई - क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांची आज एनसीबी कोठडी संपत असून, यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. आज किल्ला कोर्टात आर्यन खानला जामीन मिळणार की, कारागृहातील त्याचा मुक्काम वाढणार याचा फैसला आज होणार आहे.

आज होणार निर्णय-

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डींया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. त्यानंतर, सोमवारी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना काला किल्ला कोर्टात हरज करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने (7 ऑक्टोबर)पर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. आज या तिघांची आज एनसीबी कोठडी संपत असून, यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

प्रकरणात आतापर्यत १७ जणांना अटक-

एकीकडे एनसीबीकडून ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी केली जात असताना आणखी काही जणांची नावे समोर आली आहेत. त्यानुसार अब्दुल शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या आणि अविन शाहू या चार जणांना एनसीबीने मंगळवारी अटक केली होती. या चौघांना जेजे रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. त्यांना काल कोर्टात हजर केले असता त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. काल एनसीबीने अनेक ठिकाणी छापे मारून रात्री पवई परिसरातून आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन, एनसीबी कार्यालयात नेले. अचिंत कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे, त्याला मुंबईच्या पवई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे, त्याच्याकडून काही प्रमाणात औषधेही जप्त करण्यात आली आहेत. यामुळे याप्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता १७ वर पोहचली आहे.

हेही वाचा - भाजप सरकार खुन्यांना का वाचवतय?, संजय राऊतांची लखीमपुर प्रकरणावर प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.