ETV Bharat / city

LIVE UPDETES ड्रग्स पार्टी प्रकरण : आर्यन खानला जेल की बेल; जामीन अर्जावर दुपारी सुनावणी - शाहरुखचा मुलगा आर्यन खान

Aryan Khan's bail application to be heard in Sessions Court today
आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
author img

By

Published : Oct 13, 2021, 11:18 AM IST

Updated : Oct 13, 2021, 12:33 PM IST

12:10 October 13

शाहरूखच्या मॅनेजरचे कोर्ट रूममध्ये उपस्थित राहण्याकरिता लिखित निवेदन

शाहरुख खानच्या मॅनेजरने कोर्ट रूममध्ये उपस्थित राहण्याकरिता लिखित निवेदन दिले.

11:44 October 13

एनसीबीची वेळ वाढवण्याची मागणी मान्य; उत्तराची प्रत दाखल करण्याचे निर्देश

- एनसीबीचे वकील उच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीत व्यस्त असल्याने त्यांना यायला उशीर होणार आहे. त्यामुळे आज दुपारी आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुमावणी ठेवण्याची विनंती एनसीबीने केली आहे. ही विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. तोपर्यंत उत्तराची प्रत दाखल करण्याचे निर्देश.

11:37 October 13

एनसीबीने सुनावणीसाठी मागितला वेळ; वकील इतर प्रकरणातील सुनावणीत व्यस्त

- एनसीबीचे वकील उच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीत व्यस्त असल्याने त्यांना यायला उशीर होणार आहे. त्यामुळे आज दुपारी आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुमावणी ठेवण्याची विनंती एनसीबीने केली आहे.

11:35 October 13

आर्यनच्या वकिलांची टीम न्यायालयात हजर

- मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांच्यासमोर आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार. 

- आर्यन खानचे वकील अमित देसाई व त्यांची टीम न्यायालयात हजर.

11:05 October 13

आर्यन खानला जेल की बेल याचा आज निर्णय

मुंबई - बॉलिवूड स्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. 

  • काय आहे नेमके प्रकरण? 

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना अटक केली होती. ७ ऑक्टोबरला आर्यन खानसह आठ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार त्यांना आर्थर रोड जेल तसेच भायखळा महिला जेलमध्ये पाठवण्यात आले होते. या प्रकरणी अद्याप १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

Last Updated : Oct 13, 2021, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.