मुंबई - क्रूझ ड्रग प्रकरणात (Cruise Drug Case Update) जामीन देताना आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी एनसीबी कार्यालयात (Aryan Khan attends NCB office) आज हजेरी लावली आहे.
- दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी -
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी एनसीबी कार्यालयात आज हजेरी लावली. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्यांना जामिनाचे कागदपत्र सादर करून एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.
- नेमके काय आहे प्रकरण?
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला मुंबईतील क्रूझवर सुरू असलेल्या पार्टीवर छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा आहे. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातून जामीनावर सुटका झाली होती. उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागत आहे.