ETV Bharat / city

नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, आता मी पुढची कथा सांगेन - संजय राऊत - Sameer Wankhede

एनसीबी छापेमारी बाबत गंभीर खुलासे होत असून याप्रकरणी राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि शिवसेनेचे संजय राऊत आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट आतापर्यंत सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असे राऊत यांनी सांगितले.

Aryan Khan drug case sanjay raut reaction
संजय राऊत
author img

By

Published : Oct 25, 2021, 2:19 PM IST

मुंबई - आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळे वळण लागताना दिसत आहे. काल पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबी छापेमारी बाबत गंभीर खुलासे केले होते. यानंतर राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि शिवसेनेचे संजय राऊत आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट आतापर्यंत सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असे राऊत यांनी सांगितले.

नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, आता मी पुढची कथा सांगेन - संजय राऊत
या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होतं. त्याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणांमध्ये साईला अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याची सुरक्षा राज्य सरकारने केली पाहिजे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोललो आहे. त्याच्या साहसाला मी दाद देतो. त्याने देशावर उपकार केले. या प्रकरणातील साक्षीदाराचा बालही बाका होणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत, असे राऊत म्हणाले. या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होतं त्याची चौकशी झाली पाहिजे, सीबीआय तुमच्या खिशात आहे ना? तुम्हीही अनेक व्हिडीओ बाहेर आणले. पण तुमच्या काळजाला वार झाला. तुम्ही म्हणताय ना चौकशी करा. अजून दहा व्हिडीओ मी तुम्हाला देतो, करा चौकशी, अस उलट आव्हान ही राऊत यांनी भाजपला दिले आहे.गोसावी याचे काही घातपात झाला अशी शंका काहींनी उपस्थित केली होती. यावेळी बोलताना राऊत यांनी सांगितले की केपी गोसावी, परमबीर सिंग कुठे हे भाजपला माहीत असेल. गोसावीचा घातपात झाला की नाही हे ज्याने शंका उपस्थित केली. तेच सांगू शकतील. सॅम डिसोजाचा संदर्भ मनी लॉन्ड्रिंगमध्ये येते. बड्या लोकांचे पैसे तो परदेशात पाठवतो.या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.