ETV Bharat / city

Arvind Sawant : संजय राऊत ईडीच्या ताब्यात; अरविंद सावंतांची केंद्र सरकारवर कडाडून टीका, म्हणाले... - अरविंद सावंत संजय राऊत मराठी बातमी

ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतले ( ED Detained Sanjay Raut ) आहे. त्यावरुन शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी ईडी आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली ( Arvind Sawant Criticized Modi Government ) आहे.

Arvind Sawant sanjay raut
Arvind Sawant sanjay raut
author img

By

Published : Jul 31, 2022, 5:43 PM IST

Updated : Jul 31, 2022, 5:49 PM IST

मुंबई - मुंबई गोरेगाव येथील 1 हजार 34 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी छापेमारी केली होती. सकाळी सात वाजल्यापासून ईडी संजय राऊतांची चौकशी करत होती. त्यानंतर आता ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतले ( ED Detained Sanjay Raut ) आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी ईडी आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. ईडी केंद्र सरकारची गुलाम आहे, अशा शब्दांत सावंतांनी संताप व्यक्त केला ( Arvind Sawant Criticized Modi Government ) आहे.

'मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी...' - शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी सकाळी सात वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी धडक देत कारवाईला सुरुवात केली. तब्बल नऊ तास राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी केली. चौकशीला सहकार्य करत नाहीत, असा ठपका ठेवत ईडीने संजय राऊत यांना दुपारी चार वाजता ताब्यात घेतले. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ईडीवर जोरदार टीका केली. 'भाजपचे मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे. या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. देशात लोकशाही टिकवायचे असेल तर चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांनी ही या विरोधात भूमिका घेणे अपेक्षित असल्याचे,' अरविंद सावंत म्हणाले.

'ईडी केंद्र सरकारची गुलाम' - 'शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत गेलेल्या अनेकांवर किरीट सोमैयांनी आरोप केले आहेत. मात्र, भाजपसोबत सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई ढिली पडली, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला. ठराविक लोकांना टार्गेट करून ईडी कारवाई करत आहे. ईडी केंद्र सरकारची गुलाम आहे. तसेच प्रताप सरनाईक, भावना गवळी, आनंद अडसूळ आदीवर कधी कारवाई करणार,' असा सवालही अरविंद सावंतांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : 'संजय राऊतांना अटक होऊ शकते; महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्याला...'; उद्धव ठाकरेंचा इशारा

Last Updated : Jul 31, 2022, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.