मुंबई - कोरोनाकाळात महाविकास आघाडी सरकारने मार्चमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. विशेष म्हणजे 29 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी कर्जमाफीसाठी 10 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल 2100 कोटी रुपयांची तरतूद आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागासाठी करण्यात आली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. उद्याच या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मंजुरी घेतली जाणार आहे.
पुरवणी मागण्यांमध्ये..
- ग्रामीण आणि शहरी भागात रुग्णवाहिका खरेदीसाठी 50 कोटींची तरतूद
- ग्रामीण भागातील रुग्णालयातील आहार खर्चासाठी 69 कोटींची तरतूद
- महात्मा फुले आरोग्य योजनेच्या विम्याच्या पहिल्या हप्त्यासाठी 541 कोटी
- प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 50 कोटी
- साथरोग नियंत्रणवरील औषध खरेदीसाठी 634 कोटी
- आशा वर्कर्स मानधनसाठी 129 कोटी
- वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामुग्री खरेदीसाठी 300 कोटी
- निसर्ग चक्रीवादळमुळे नुकसान झालेल्या फळबागांच्या पुर्नलागवडीसाठी 50 कोटी रुपये
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी 30 कोटी
- दुधाचा भाव पडत असल्यामुळे दूध भुकटीच्या योजनेसाठी 316 कोटी
- सामाजिक न्याय विभागाला 856 कोटी
- ग्रामविकास विभागाला 825 कोटी
- नगरविकास खात्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतुद
- कृषी विभागासाठी 441 कोटी
- जलसंपदा विभागाला 305 कोटी
- अशोक चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला अवघे 50 कोटी