ETV Bharat / city

Scholarship: दहावीपुर्व आणि नंतर शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

Scholarship: दहावी पूर्व आणि दहावीनंतर देशातील अनु जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी अनेक अडथळे येतात. त्या अडथळ्यांना पार करण्यासाठी म्हणून हे केंद्र सरकार प्रायोजित आर्थिक मदत करणारी योजना अनेक वर्षापासून सुरू आहे. विशेष करून दहावीनंतरच्या शिक्षणासाठी गळती कमी करणे आर्थिक मदत देणे आणि शिक्षणामधली रुची वाढवणे. यासाठी ही दहावीनंतर व दहावी आधीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती शासन देते.

Scholarship
Scholarship
author img

By

Published : Oct 16, 2022, 5:03 PM IST

मुंबई: दहावी पूर्व आणि दहावीनंतर देशातील अनु जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी अनेक अडथळे येतात. त्या अडथळ्यांना पार करण्यासाठी म्हणून हे केंद्र सरकार प्रायोजित आर्थिक मदत करणारी योजना अनेक वर्षापासून सुरू आहे. विशेष करून दहावीनंतरच्या शिक्षणासाठी गळती कमी करणे आर्थिक मदत देणे आणि शिक्षणामधली रुची वाढवणे. यासाठी ही दहावीनंतर व दहावी आधीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती शासन देते. गेल्या २०१८- १९ पासून हि शिष्यवृत्ती लाखो विद्यार्थ्यांना मिळाली नाही. यंदा विद्यार्थी संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. पहिला टप्पा मुदत ११ नोव्हेम्बर २०२२ पर्यंत आहे.

योजनेचे उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे. उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी गळती प्रमाण कमी करणे. उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे. पारदर्शकता, ऐक्य आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क जसे की, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञेय शुल्क यांची परतफेड प्रदान करण्यात येईल. विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिले जाणारे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, जे अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहे. ते या योजनेत समाविष्ट आहे.

पात्रता काय आहे जाणून घ्या आई वडिलांचे, पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,००० पेक्षा जास्त असावे.• विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा. • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. • विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा. • शासकीय मान्यताप्राप्त असलेली आणि महाराष्ट्रात स्थित असलेली संस्था असावी. • विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ CAP माध्यमातून प्रवेश घेतलेला असावा. • संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत केवळ एकदा अनुत्तीर्ण ग्राह्य धरले जाईल. Documents Required • उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी प्रदान केलेले) • जात प्रमाणपत्र. • जात पडताळणी प्रमाणपत्र • गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका • १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका • वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) • वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) • CAP फेरी वाटप पत्र

कोणते लाभ मिळतात या योजनेअंतर्गत नवबौध्द, अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील- प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत गट १, गट २, गट ३, गट ४, प्रति महिना (अधिकतम १० महिने) याप्रमाणे देखभाल भत्ता प्रदान केला जातो.

डे स्कॉलर: (दरमहा रुपयांमध्ये) गट १ : ५५०रु तर गट २ : ५३०रु तर गट ३ : ३००रु तर गट ४ : २३०रु तर होस्टेलर राहणाऱ्या करिता (दरमहा रुपयांमध्ये) गट १ : १२०० रु तर गट २ : ८२०रु आणि गट ३ : ५७० रु आणि गट ४ : ३८० रु रु खालील दिलेल्या शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन कागदपत्रे सह माहिती अपलोड करा. https://mahadbtmahait.gov.in/

अर्ज भरताना घ्यावयाची काळजी व तक्रार कुठे कराल आपले नोंदणीकृत वापरकर्ता नाव प्रविष्ट करा, आपला संकेतशब्द प्रविष्ट करा (पासवर्ड), प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा. लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा. जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, पासवर्ड विसरला बटणावर क्लिक करा. जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, वापरकर्ता नाव विसरला बटणावर क्लिक करा. तक्रार इथे करा https://mahadbtmahait.gov.in/Grievance/Grievance असे राष्ट्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने सूचित केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.