APMC Market Prices : एपीएमसी मार्केट मध्ये लिंबू, मिरची व टोमॅटोचे दर झाले कमी... इतर भाज्यांचे दर स्थिर... - कृषी उत्पन्न बाजार समिती
नवी मुंबईतील ( Navi Mumbai ) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज लिंबू, मिरची आणि टोमॅटोचे दर कमी झाल्याचे पहायला मिळाले. इतर भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर होते. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० किलोंप्रमाणे मिरचीचे दर ४०० रुपयांनी कमी झाले आहे. टोमॅटो आठशे रुपयांनी स्वस्त झाले आहेत. लिंबाच्या किंमती तब्बल दीड हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत.
भाज्यांचे दर स्थिर
By
Published : Jul 18, 2022, 7:53 AM IST
नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 100 जुड्यांप्रमाणे शेपुचे दर 800 रुपयांनी वाढले आहे. पालकचे दर 300 रुपयांनी वाढले आहे. तर मुळ्याचे दर 400 रुपयांनी वाढले आहे. 100 किलो प्रमाणे वांग्याच्या दरात 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात हजार ते 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर 100 किलोंप्रमाणे वाटाण्याचे दर हजार ते 2 हजार रुपयांनी घटले आहेत.