मुंबई: पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात अनुप डांगे यांनी म्हटले आहे की, 12 एप्रिल 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने उद्योजक जितेंद्र नवलानी उर्फ जितू नवलानी यांच्याविरुद्ध एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले. त्यावर मुंबई पोलिसांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावी. डांगे यांनी आरोप केले की या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक किशोर शिंदे यांनी या प्रकरणाचा योग्य रितीने तपास केला नाही याशिवाय गावदेवी विभागाचे एसीपी किरण काळे व इतर अधिकाऱ्यांनी मुद्दाम जितेंद्र नवलानीला फायदा करून देण्यासाठी तपासात उणिवा ठेवल्या. आणि त्याच्या आधारे हा एफआयआर रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
2019 मध्ये मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानीच्या बारवर छापा टाकला तेव्हा नवलानी यांनी पोलिसांना रोखले आणि त्याच आरोपावरून गावदेवी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआर 12 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. नवलानी यांना फायदा व्हावा यासाठी तपास अधिकार्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि कायद्याने घालून दिलेले नियम जाणूनबुजून धुडकावले आहेत. याशिवाय न्यायासाठी मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्व तथ्यांसह सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे आवश्यक आहे. डांगे यांनी कायद्यातील विविध पैलू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक आदेशांचाही उल्लेख केला आहे तसेच पोलीस आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर यापूर्वीदेखील आणि खंडणीचे आरोप झाले आहेत तसेच सीबीआय आणि एसीबीने माझा या प्रकरणात जवाब नोंदवलेला आहे या सर्व प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे दिला आहे असे देखील डांगे यांनी पत्रात म्हटले आहे. सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि इतरांविरुद्ध नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यासंदर्भात बुकी केतन तन्ना यांचा जवाब नोंदवलेला आहे. तन्ना यांनी सीबीआयला त्यांच्या संभाषण झालेले फोन रेकॉर्डिंग सुद्धा दिलेले आहे असे देखील पत्रात म्हणले आहे.
शिवसेना खासदार तथा नेते संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांसाठी मुंबईतील व्यावसायिकांकडून कारवाईच्या नावाखाली खंडणी जमा करतात असा आरोप लावल्यानंतर लाचलुचपत विभागाकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात आली असता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई लाचलुचपत विभागाकडून जितेंद्र नवलाने यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे अद्यापही जितेंद्र नवलाने यांना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलेले नाही.