ETV Bharat / city

अँटिलिया प्रकरण : वझेंनंतर मुंबई पोलिसांतील आणखी काही अधिकाऱ्यांची होणार चौकशी? - एनआयए

अँटिलिया प्रकरणी मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.

अँटिलिया प्रकरण : वझेंनंतर मुंबई पोलिसांतील आणखी काही अधिकाऱ्यांची होणार चौकशी?

author img

By

Published : Mar 14, 2021, 8:45 AM IST

मुंबई : अँटिलिया प्रकरणी मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे. ठाणे येथून आणखी 3 जणांच्या अटकेची शक्यता या प्रकरणी व्यक्त केली जात आहे. इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाला याप्रकरणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी एनआयएच्या तीन टीम रवाना झाल्याचेही समजते आहे.

वझेंना कोर्टासमोर हजर करणार

अँटिलिया प्रकरणी अटक केलेले पोलीस अधिकारी सचिन वझेंना एनआयएकडून न्यायालयात हजर केले जाणार आहे. रिमांडच्या मागणीसाठी एनआयएकडून त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. अँटिलिया प्रकरणी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर शनिवारी रात्री उशीरा सचिन वझेंना एनआयएने अटक केली.

शनिवारी दिवसभर वझेंची चौकशी

एनआयएकडून सचिन वझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते. तिथे तब्बल १३ तास चौकशी केल्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वझे यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये सचिन वझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक सापडल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरु होता. या पथकामध्ये सचिन वझे यांचादेखील समावेश होता. दरम्यान, मनसुख यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने या घटनेला गंभीर वळण लागले. यावेळी विरोधी पक्षाने वझे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत, त्यांना अद्याप अटक का केली नाही, असा प्रश्नच सरकारपुढे उपस्थित केला होता.

धक्कादायक बाबींचा खुलासा

तसेच मनसुख यांची पत्नी विमला यांनी देखील गुन्हा दाखल करीत वझे हेच त्यांच्या पतीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे याचा तपास एटीएसने करण्यास सुरुवात केली आणि वझे यांचा जबाब देखील नोंदविला. तर, अँटिलिया बाहेरील स्फोटकांचा तपास एनआयएकडे सोपविल्याने, त्यांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला. त्यानंतर वझे यांना चौकशीसाठी बोलावले. त्यानुसार वझे हे सकाळी ११ वाजता एनआयएच्या चौकशीला हजर राहिले होते.

अटक पूर्व जामीनासाठी न्यायालयात केला होता अर्ज

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएस यंत्रणेने हत्येचा गुन्हा दाखल केल्याने अटक होण्याच्या उंबरठ्यावरील सचिन वझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जाचे परीक्षण केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायधीश शैलेंद्र तांबे यांनी मात्र अटकपूर्व जामीन देता येणार नसल्याचे सांगितले. मुख्य संशयित असलेल्या वझे यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्यामुळे सचिन वझे यांचा जामीन देता येणार नाही, असा निष्कर्षही नोंदविण्यात आला होता. यावर १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. याप्रकरणानंतर त्यांनी वॉट्सअॅप स्टेटस ठेवले. यामुळे एकच खळबळ माजली. तसेच एनआयए चौकशीत संशयाची सुई वझे यांच्याकडेच जात होती. तब्बल १३ तास वझे यांची चौकशी करण्यात आली.

हेही वाचा - अँटिलिया प्रकरण: सचिन वझेंना 'एनआयए'कडून अटक, आज कोर्टात हजर करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.