मुंबई - मानखुर्द जवळील मुंबई पनवेल हायवेवर Mumbai Panvel Highway अमली पदार्थ विरोधी पथक बांद्रा युनिटने Anti Narcotics Squad Bandra 2 kg MD drugs seized दोन किलो पेक्षा जास्त वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच दोन आफ्रिकन वंशाच्या लोकांना Two African origin accused arrested अटक केली आहे. मायकल नवाबु चुकवुम 34 आणि ज़ोक्वेसिरी ओनेका ओकेचुकवू 46 असे दोन्ही आरोपींची नावे आहे. दोन्ही आरोपी नायजेरिया असून नवी मुंबई येथील खारघर येथे राहणारे आहेत. दोघांविरोधात तुलिंज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई पनवेल हायवेवर दोन इसमांचे संशयास्पद हालचाल आढळून आल्याने अमली पदार्थ विरोधी पथक वांद्रे युनिटच्या पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्याकडे एका बॅगेत दोन किलो पेक्षा जास्त वजनाचे ड्रग्स आढळून आले. या एमडी ड्रग्सची किंमत दोन करोड 80 लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन तुळस पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 कलम 8 क 22 क अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. मायकल या आरोपी विरोधात पालघर जिल्ह्यात हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे.
हेही वाचा - Mass self immolation movement रस्त्यासाठी शरीफपुरवाडी ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन