मुंबई - शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी करून सरकारविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर करण्यात आला होता.
हेही वाचा - शरद पवार ईडी कार्यालयात जाणार नाहीत; पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर निर्णय मागे
पवार यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील पक्षाच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. हे कार्यकर्ते सरकारविरोधात घोषणाबाजी करून पवार यांच्यावर होणाऱ्या कारवाईचा निषेध करत होते. या कार्यकर्त्यांनी कोणताही अनुचित प्रकार करू नये, यासाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर करण्यात आला.