मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रविवारी (दि. 2 जानेवारी) ठाकरे कुटुंबीयांची सून व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्याअंकिता पाटील ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली ( Ankita Patil Thackeray Corona Positive ) आहे. अंकिता यांनी समाज माध्यमावरून याबाबत माहिती दिली.
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख वाढतो आहे. दुसरीकडे ओमायक्रॉन ( Omicron Variant ) विषाणूचा प्रसार वेगाने होतो आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील दहा मंत्री विषाणूबाधित आहेत. अंकिता पाटील व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे हे दोघे 28 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये थाटामाटात त्यांचा विवाह झाला होता. यानंतर हर्षवर्धन पाटील कोरोनाबाधित आढळून आले होते. आज हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता यांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय केलय ट्वीट..?
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे ट्वीट अंकिता पाटील ठाकरे यांनी केले आहे.
हे ही वाचा - State Women Commission : महिलांच्या ऑनलाइन बदनामीची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, कारवाई करण्याचे दिले निर्देश