मुंबई : शिवसेना नेते, माजी परिवहन मंत्री अनिल परब (Shiv Sena leader Anil Parab) यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर नवरात्रोत्सवात तोडक कारवाई (Anil Parab Dapoli resort demolition action) सुरू होऊन दिवाळी पर्यंत तो जमीनदोस्त केला जाईल, असा दावा भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya pointer Anil Parab on Dapoli Resot) यांनी केला आहे. आज ते दापोली दौऱ्यावर (Kirit Somaiya Dapoli tour) आहेत. याप्रसंगी ते बोलत होते. (Latest News from Mumbai)
काय म्हणाले सोमय्या?
याप्रसंगी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, अनिल परब यांचा दापोली येथील रिसॉर्ट नवरात्रीत तोडण्यास सुरुवात होणार आहे (kirit Somaiya criticized Anil parab). हा रिसॉर्ट दिवाळीपर्यंत जमीन दोस्त झालेला असेल. उद्या या रिसॉर्ट संदर्भात राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी होणार आहे. तसेच यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, म्हणून मी दापोली येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत आहे.
प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल?
उद्धव ठाकरे यांचे उजवा हात समजले जाणारे संजय राऊत हे सध्या जेलमध्ये आहे. त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल परब यांच्यावर लवकरच फौजदारी कारवाई सुरू होणार असून या अनधिकृत रिसॉर्ट बाबत प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा अनिल परब यांना द्यावा लागणार आहे, असेही किरीट सोमय्या म्हणाले.
रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी - याच पाश्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी शिवसेनेला Shivsena पुन्हा धक्का दिला आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट Resort Shiv Sena leader Anil Parab Dapoli पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केले असल्याची किरीट सोमैयांंनी यापूर्वी BJP Leader Kirit Somaiya दिली होती. मुख्यमंत्री यांनी अनिल परब यांच्या दापोली येथिल अनधिकृत रिसॉर्ट पाडावे या Unauthorized resort demolished फाईलवर सही करण्यात आली आहे. पर्यावरण विभाग रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देणार असल्याची माहितीही सोमैयांनी दिली होती.
प्रतिक्रिया देताना भाजपा नेते किरीट सोमैया - माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे रत्नागिरीतील रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सही केली असल्याची माहिती भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी दिली होती. त्यामुळे अनिल परब यांचे रत्नागिरीतील रिसॉर्ट दिवाळीपर्यंत इतिहासजमा होणार असल्याचे सोमैया म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केल्याचे सोमैया यांनी सांगितले आहे. दरम्यान आता पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल गेली आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकार्यांना आदेश दिले जाणार असल्याचे सोमैयांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात रत्नागिरी जिल्हाधिकारी हे त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती देखील सोमय्यांना दिली. शनिवारी मी दापोलीला यात्रा करणार आहे. रिसॉर्ट पडणार आणि या रिसॉर्टसाठी लावलेले पैसे कोठून आले याची देखील तपासणी होणार असल्याचे सोमैयांनी सांगितले.