मुंबई - सचिन वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिले आहे, त्यात मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पत्रात अनिल परब यांनी देखील खंडणी वसूल करण्याची मागणी केल्याचे सचिन वाझे यांनी म्हटले आहे. मात्र अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, मी कोणत्याही चौकशीला समोर जाण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'मी राजीनामा देणार'
दरम्यान हे सर्व मुख्यमंत्री आणि शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपकडून करण्यात येत आहे. भाजप केंद्राला हाताशी धरून हे सर्व करत आहे. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी आरोप करायचे आणि आम्ही राजीनामे द्यायचे असे आता होणार नाही. मी राजीनामा न देता कुठल्याही चौकशीला समोरे जाण्यास तयार आहे. परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात माझे नाव नाही, मग सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माझे नाव कसे आले? या सर्व प्रकरणाशी माझा संबंध नाही असेही या पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - रेमडेसिवीर औषध मिळेना; पुण्यात रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट