मुंबई - दापोलीत बंद असलेले साई रिसॉर्टचे ( Anil Parab Sai Resort Case ) सांडपाणी समुद्रात सोडल्याच्या तक्रारीवरून ईडीने आपल्या शासकीय निवासस्थान, खासगी निवासस्थान ( ED Raid On Anil Parab Property ) आणि निकटवर्तीयांवर धाडी टाकल्या. आजच्या कारवाईत मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा कुठलाही संबंध नव्हता. तसेच साई रिसॉर्ट हे आपल्या मालकीचे नसून सदानंद कदम यांच्या मालकीचे आहे. याबाबतचे कागदोपत्री पुरावे त्यांनी कोर्टासमोर ठेवले असून याबाबतचा सर्व आर्थिक व्यवहाराची माहिती त्यांनी दिली आहे, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. आज ईडीकडून त्यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थानासहित सात जागी धाडी टाकल्या होत्या. ईडीकडून करण्यात आलेल्या 13 तासाच्या चौकशीनंतर मंत्री अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
आपल्यावर ईडीकडून धाड टाकली जाईल, अशा बातम्या सातत्याने गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमात सुरू होत्या. दापोलीत असलेल्या साई रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात सोडण्याची तक्रार केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. याबाबतचे दोन गुन्हे दाखल झाले असून याबाबतची कारवाई ईडीकडून आज धाड टाकून करण्यात आली. ज्या रिसॉर्टची तक्रार करण्यात आली आहे, ते रिसॉर्ट अद्याप सुरूही झालेले नाही. बंद रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात टाकल्याची तक्रार माझ्या नावे करण्यात आली असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. तसेच झालेल्या चौकशीच्या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे ताब्यात घेतले असल्याची माहिती परब यांनी दिली.
तपासाला सहकार्य करणार - आज ईडीच्या अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण दिली. याआधीही आपण तपास यंत्रणांना सहकार्य केलं होत. यानंतर ही त्यांच्या सर्व प्रश्नांना आपण उत्तर देऊ. मात्र, आजच्या घातलेल्या धाडीत मनी लॉन्ड्रिंगचा कुठलाही संबंध नव्हता, असं अनिल परब यांनी स्पष्ट केल आहे.
हेही वाचा - CM Thackeray Mumbai : कोरोना पूर्ण गेला नाही, मास्क वापरत राहा; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन