ETV Bharat / city

Anil Deshmukh On Anil Parab : अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "अनिल परब पोलीस बदलीबाबत..." - Anil Deshmukh On Police Posting

अनिल परब हे पोलीस बदलीबाबत यादी द्यायचे असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला ( Anil Deshmukh Accused Anil Parab ) आहे. ईडीच्या चार्टशीटमध्ये हा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच, परमबीर सिंगच स्फोटकं प्रकरणाचे मास्टरमाईंड परमबीर सिंगच असल्याचेही अनिल देशमुख ( Anil Deshmukh On Parambir Singh ) म्हणाले.

anil deshmukh anil parab
anil deshmukh anil parab
author img

By

Published : Feb 3, 2022, 9:32 AM IST

Updated : Feb 3, 2022, 9:57 AM IST

मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांनी ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलीस विभागातील बदली संदर्भातील यादी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. ती यादी मी गृहसचिव यांना दिली, असा जबाब त्यांनी ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देशमुख यांच्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण ( Anil Deshmukh Accused Anil Parab ) झाली आहे.

ईडीला दिलेल्या जबाबात अनिल देशमुखांनी म्हटले आहे की, मी कोणत्याही प्रकारची बदल्यांची यादी दिली नव्हती. पोलीस बदली संदर्भात अधिकाऱ्यांची यादी अनिल परब यांनी दिली होती. त्या यादीवर कोणाचीही स्वाक्षरी नव्हती. अनिल परब यांनी ही यादी त्यांच्याशी निगडीत आमदारांकडून मिळायची. ती यादी अतिरिक्त गृहसचिव यांना देण्यात येत असे. तसेच, नियमात बसत असेल तर पुढील कारवाई करण्यात यावी, अन्यथा करु नये, असे सांगितल्याचे अनिल देशमुख ( Anil Deshmukh On Police Posting ) यांनी म्हटलं.

परमबीर सिंगच स्फोटकं प्रकरणाचे मास्टरमाईंड

पुढे अनिल देशमुख म्हणाले ( Anil Deshmukh On Parambir Singh ) की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच अँटिलिया स्फोटकं प्रकरणाचे मास्टरमाईंड होते. मात्र, स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर सिंग दिशाभूल करत होते. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर आपण नैतिकता म्हणून राजीनामा दिला, असेही ईडीच्या आरोपत्रात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - Mumbai Crime News : मुलुंडमध्ये थरार, बंदुकीचा धाक दाखवत एक करोड लुटले

Last Updated : Feb 3, 2022, 9:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.