मुंबई: अंधेरी विधानसभा निवडणुकीत Andheri Assembly Elections ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लट्टे यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बीएमसी आणि ऋतुजा लटके यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बीएमसीला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे पत्र देण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी बीएमसी प्रशासनाने तत्काळ राजीनामा स्वीकारण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यावर आता शिवसेनेचे नेते व आमदार अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली असून या मधल्या काळात सर्वात गलिच्छ राजकारण झाले असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.
हे घाणेरडं राजकारण माध्यमाशी संवाद साधताना शिवसेनेचे नेते व आमदार अनिल परब म्हणाले की, ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळू नये. यासाठी शेवटच्या क्षणांपर्यंत प्रयत्न सुरु होते. आणि त्यांनी 3 तारखेला राजीनामा दिला आणि नंतर 12 तारखेला भ्रष्टाचारचे आरोप केले जातात. हे किती घाणेरडे राजकारण आहे. उद्या आम्ही सर्व कार्यकर्ता घेऊन जाणार आणि उमेदवारी अर्ज भरणार आहोत. आता त्यांनी मोठं मन दाखवावे आणि ही निवडणूक बिनविरोध करावी. असे आवाहन अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
विजयासाठी पूर्ण प्रयत्न करणार पुढे बोलताना आमदार फरक म्हणाले की, आपली अशी परंपरा होती की जर कोणाचे निधन झालं, तर आपण ती निवडणूक बिनविरोध करतो. निवडणुकीच्या निकालानंतर मी विजय मानतो. ही बाळासाहेब यांची शिकवण आहे. माझा उमेदवार हा बाळासाहेब यांचा उमेदवार उद्धव साहेब यांचा उमेदवार विजयी करणे, माझे कर्तव्य आहे. एक दिवंगत आमदारची पत्नी लढवण्यासाठी तयार असताना आम्हाला उच्च न्यायालयामध्ये जावे लागते ही दुर्दैव आहे.