मुंबई - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना ईडीने ( Ed ) अटक केल्यानंतर 15 दिवस कोठडीत ठेवले होते त्यानंतर अनिल देशमुख यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तेव्हापासून अनिल देशमुख हे आर्थर रोड जेलमध्ये ( Arthur Road Prison ) न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी जामीन मिळवण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयात देखील अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर अद्याप सुनावणी घेण्यात आलेली नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालयाला अनिल देशमुख यांच्या प्रकरणात लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
हेही वाचा - Abu Azmi Threat : अबू आझमींना धमकी देणाऱ्या युवकाला पुण्यातून अटक
काय आहे प्रकरण - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परंबिर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ( Uddhav Thackeray ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा टारगेट दिला होता असे खळबळजनक आरोप परमवीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केले होते. यानंतर निलंबित API सचिन वाझे यांच्यावर या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली तसेच देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहसचिव कुंदन शिंदे यांनाही या प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा - Assembly speaker Rahul Narwekar : शिवसेनेचे आमदार अपात्र होऊ शकतात, विधानसभा अध्यक्षांचे खळबळजनक संकेत