मुंबई - विशेष पीएमएलए न्यायालयाने १ जुलै पर्यंत आरोपी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना ईडी कोठडीत धाडले आहे. ई़डीने या दोघांना 25 जून रोजी उशिरा रात्री अटक केली होती. माजी गृहमंत्री देशमुख आणि त्यांचे सहकरी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची लाचखोरी व खंडणी प्रकरणात चौकशी सुरू आहे.
हेही वाचा - रुग्णाला अशा पद्धतीने मिळते 'डेल्टा प्लस व्हेरियंट'ची लागण झाल्याची माहिती
मुंबई आणि नागपूर येथे देशमुख यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. संजीव पलांडे हे अनिल देशमुख यांचे निजी सचिव आहेत, तर कुंदन त्यांचे वैयक्तिक सहाय्यक आहेत. दोघांनीही ईडीच्या चौकशीदरम्यान त्यांच्या वकिलांची उपस्थिती मान्य करावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ईडीने अनिल देशमुख यांना समन्स बजावले
दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीइकडून 29 जून रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून 100 कोटी रुपयांची खंडणी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी न्यायालयाने सीबीआयला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले होते. अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सदर आरोपांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती चंडिवाल आयोगाची स्थापना केली. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. ईडी आणि सीबीआय संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.
हेही वाचा - संजय राऊत म्हणतात, 'कुणी काहीही म्हणाे, मुख्यमंत्री आमचाच'