मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून शंभर कोटी रुपयांचे वसुली करण्याचे निर्देश दिल्या प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात ( Anil Deshmukh Case )आला होता. या प्रकरणात आज ( 18 जुलै ) दिल्ली सीबीआयकडून राज्याचे माजी दोन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि संजय पांडे यांची 6 तास चौकशी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली ( cbi questions Param Bir Singh and Sanjay Pandey ) आहे.
अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वसुलीचे आरोप लावले होते. त्यानतंर या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वकील जयश्री पाटील यांनी केली होती. मग या प्रकरणात सीबीआय गुन्हा दाखल केला होता. तर, अनिल देशमुख यांच्यावर लावलेले आरोप मागे घेण्यासाठी परमबीर सिंग यांना सांगितले होते, असा आरोप संजय पांडे यांच्यावर लावण्यात आला होता.
18 कोटी गैरव्यवहार प्रकरणात संजय पांडेंची चौकशी - दरम्यान, ईडीने देखील संजय पांडे यांची 8 तास चौकशी केली आहे. ही चौकशी पांडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील एकूण 18 कोटी रुपयांच्या विविध व्यवहारांबाबत होती. पांडे यांच्या कुटुंबाशीच्या कंपनीशी संबंधित 18 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत ईडी देखील तपास करत आहे. व्यवहाराच्या स्त्रोतासह हे व्यवहार कोणत्या कारणासाठी करण्यात आले होते, याबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काय अनिल देशमुख प्रकरण? - गृहमंत्रिपदी असताना अनिल देशमुख यांनी शंभर कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला होता. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला. त्याचदरम्यान देशमुख यांनी पैशांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडीने अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे स्वीय सचिव कुंदन शिंदे व संजीव पलांडे यांना अटक केली. ईडीकडून पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू असतानाच सीबीआयला मूळ 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपाचा तपास करायचा आहे. यामुळे सीबीआयनेदेखील अनिल देशमुख यांच्यासह कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना एप्रिलमध्ये अटक केली होती. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडी आहे.
हेही वाचा - Eknath Shinde :शिंदे गटाने केली शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर