मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली ( ED Arrested Anil Deshmukh ) होती ईडीने अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांनी 4 जानेवारीला मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल ( Anil Deshmukh Application for Bail ) केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. तसेच संतोष परब हल्ला प्रकरणात ( Santosh Parab Attack Case ) सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेतली. त्यांच्या जामीनावर देखील आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे या दोघांनाही दिलासा मिळतो की नाही हे पाहावे लागणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटक प्रकरण -
100 कोटी कथित प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 71 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांची पत्नीचा भाऊ यांना देखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे. अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्या जामिनाला ईडीने विरोध दर्शवला असून अनिल देशमुख यांनी जामिनासाठी केलेला अर्ज अवैध असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे ईडीने न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संतोष परब हल्ला प्रकरण -
संतोष परब हल्ला प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तेव्हापासून नितेश राणे समोर आलेले नाहीत. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. तातडीची सुनावणी घेण्यासंदर्भात न्यायालयाला विनंती केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयात मागील सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी नितेश राणे यांच्यावर पुढील सुनावणी पर्यंत कुठलीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. तसेच संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात नितेश राणे हेच प्रमुख सूत्रधार आहे, असे राज्य सरकार कडून न्यायालयासमोर सांगण्यात आले होते. त्यावर न्यायालयाने दोन दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले होते. आज या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे.