मुंबई/नवी दिल्ली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बैठक होईल. त्या बैठकीत विचार विनिमय होईल. राज्यभरातून पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील, असे शिवसेना नेते अनिल देसाई ( Anil Desai on Election commissions ) यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह वापरण्यास मनाई केल्यानंतर नव्या चिन्ह आणि पक्षाच्या नावाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंनी दिली. दिल्लीत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, निवडणूक आयोगाला दिलेल्या आकडेवारीनुसार सर्व प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. शिवसेनेला बोगस प्रतिज्ञापत्रांची ( matoshree meeting on party name ) आवश्यकता नाही. मात्र, पोलिसांनी तपास करुन खरा चेहरा उघडा पाडतील, असे अनिल देसाई म्हणाले.
निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाबद्दल सोमवारपर्यंत भूमिका ठरवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राज्यभरातील पदाधिकारी व नेते यावेळी हजर राहणार आहेत. या बैठकीत नाव, चिन्हाबाबत विचारविनिमय करुन निर्णय घेतला जाईल. आदित्य ठाकरे बैठकीस उपस्थित असणार आहेत. बैठकीत नवीन चिन्ह व नावाबाबत जो काही निर्णय होईल, त्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली जाईल, असे देसाईंनी सांगितले.
आमचा पक्ष अधिकृत पक्ष समाज माध्यमांमध्ये ठाकरे गटाचे नवे निवडणूक चिन्ह हे उगवता सूर्य किंवा मशाल, वाघ यांपैकी एक असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. देसाई यांनी यावर खुलासा केला. या नावांची चर्चा सुरू असल्याचे मलाही आताच समजते आहे. मात्र, पक्षात यावर अधिकृत चर्चा, विचारविनिमय बैठकीतच होणार आहे. तोपर्यंत माध्यमांनी संयम ठेवावा, सुत्रांच्या हवाल्याने असे वृत्त देऊ नये, असे आवाहनही देसाईंनी प्रसारमाध्यमांना केले. उद्धव ठाकरे जे निवडणूक चिन्ह ठरवतील, त्याला निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळेल का? यावर देसाईंनी स्पष्टीकरण देताना, आमचा पक्ष हा राज्यातील एक अधिकृत असा पक्ष आहे. आमच्याकडे लाखो लोकांचा जनाधार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या निवडीला मान्यता ( Shiv sena on party sign ) देईल, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
निकाल अनाकलनीय निवडणूक आयोगाचा शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय व धक्कादायक होता. आम्हाला गेल्या आठ तारखेला निवडणूक आयोगाने तातडीने कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना केली होती. तशी आम्ही ती केली. त्यानंतर निवडणूक आयोग आम्ही दाखल केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करेल व पुन्हा सोमवारी दोन्ही बाजूंचे किंवा आमचे ऐकून घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काहीही न करता निवडणूक आयोगाने हा अचानक धक्कादायक निकाल दिला आहे. निवडणूक आयोग ही संविधानाच्या चौकटीत काम करणारी संस्था आहे. त्यामुळे न्यायाच्या चौकटीत आयोग काम करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या सर्व गोष्टींना महत्त्व न देता अशाप्रकारे धक्कादायक निर्णय देणे अजिबात अपेक्षित नव्हते, असे देसाई म्हणाले.
बोगस प्रतिज्ञापत्रांची गरजच नाही- मुंबईत बोगस प्रतिज्ञापत्र सापडल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. पोलीस ठाण्यात तशी तक्रार नोंदवण्या आली असून या प्रकरणी तपास सुरु असल्याचे ते म्हणाले. तसेच ठाकरेंवर बोगस प्रतिज्ञा पत्र सादर करण्याची वेळ आली, असा आरोप केला होता. अनिल देसाईंनी यावरही भाष्य केले. शिवसेनेला कधीही बोगस प्रतिज्ञापत्रांची गरज भासली नाही. निवडणूक आयोगाला कागदपत्रांचा जो आकडा दिला होता. तो निवडणूक आयोगाकडे दिला आहे. मुंबईत कोणतेही कागदपत्रे नाहीत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. परंतु, आमची संघटात्मक ताकद मोठी आहे. बूथ ( Anil Desai on bogus affidavit ) प्रमुखांपासून मुंबईतील गटप्रमुखांपर्यंत समीकरण असून शिवसेनेला कधीही बोगस प्रतिज्ञापत्रांची गरज पडणार नाही, असा टोला शिंदे गटाला लगावला.