ETV Bharat / city

अमृता फडणवीसांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा? नव्या पोस्टवरून चर्चेचा धुरळा - शिवसेना

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर त्यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात त्या पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ उभ्या आहेत. सोशल मीडियावर डिस्लाईकसाठी वापरल्या जाणाऱ्या डाऊन थंबचा इशाराही त्यांनी या फोटोत केला आहे.

अमृता फडणवीसांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा? नव्या पोस्टवरून चर्चेचा धुरळा

author img

By

Published : Jul 16, 2021, 5:28 PM IST

मुंबई : सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर पुन्हा एक नवी पोस्ट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या पोस्टवरही आता युझर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.

अमृता फडणवीस यांची पोस्ट
अमृता फडणवीस यांची पोस्ट

ट्विटरवर फोटो टाकून महापालिकेवर टीका?

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर त्यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात त्या पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ उभ्या आहेत. सोशल मीडियावर डिस्लाईकसाठी वापरल्या जाणाऱ्या डाऊन थंबचा इशाराही त्यांनी या फोटोत केला आहे. यावर त्यांनी "इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब ! #MumbaiRains #Monsoon2021 #Mumbai " असे कॅप्शन दिले आहे. या ओळींच्या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे शिवसेनेवरच निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेवर अमृता फडणवीसांचा निशाणा?

मुंबईत पावसानंतर पाणी साचल्यामुळे यासाठी अमृता फडणवीस यांनी महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेलाच या पोस्टमधून लक्ष्य केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. युझर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

हेही वाचा - मुंबई तुंबताच अमृता फडणवीस यांचे ट्विट, म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.