मुंबई - माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर पलटवार करत त्यांच्या टीकेला खोचक टोला लगावला आहे. काल (रविवार) मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस ( AMRUTA FADNAVIS ) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्या टीकेला अमृता फडणवीस त्यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव चांगलं गातात, असं मला नुकतंच आदित्यने सांगितलं. माझ्यासाठी हा धक्का होता. कारण मला वाटलं आजपर्यंत फक्त एकच व्यक्ती गाते,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
काय आहे अमृता फडणवीस यांच्या ट्विट मध्ये?
अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की मला धक्का होता. मला वाटलं, अब्जाधीश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ व अब्जाधीशांच आहे!