मुंबई देश अमृतमहोत्सव साजरा करत असताना चिंचपोकळी येथील विजय बजरंग मंडळानेही पंचात्तरी गाठली आहे. मुंबईकरांसाठी या मंडळाचा दहीहंडी उत्सव दरवर्षी आकर्षण आणि मार्गदर्शन ठरते. मात्र, दहीहंडी उत्सव Vijay Bajrang Mandal Dahi Handi धंदेवाईक झाला आणि या मंडळाने स्पर्धेला पूर्णविराम दिला आहे.
विजय बजरंग मंडळ देखील अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणार आज काल दहीहंडी उत्सवाची स्पर्धा पाहायला मिळते. अनेक दहीहंडी मंडळे मुंबईसह राज्यात तयार झाली आहेत. नोंदणीकृत मंडळे देखील शेकडाभर असतील. त्यात चिंचपोकळीतील विजय बजरंग दहीहंडी मंडळाचे देखील नाव आहे. यंदा देशात अमृतमहोत्सवी Amrit Mahotsav वर्ष साजरा केला जातो आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. तर दुसरीकडे विजय बजरंग मंडळ देखील अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करणारे मंडळ म्हणून सुमारे ६० वर्षे नावलौकिक आहे. आजवर थरांची, बक्षिसांची स्पर्धा सुरू असताना पैशासाठी कधीही गोविंदाचा जीव धोक्यात घातला नाही. धंदेवाईक गोविंदापथक म्हणून सण साजरा केला नाही, असे मंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट्ये सांगतात.
परंतु गोविंदाची किंमत त्यापेक्षा मोलाची सुरुवातीला ५ ते २० रुपयांपर्यंत दहीहंडीचे बक्षीस लावली जात होती. आता ५ रुपये दिसत नाहीत. पाच रुपयांची किंमत त्याकाळी खूप मोठी होती. परंतु, गोविंदाची किंमत त्यापेक्षा मोलाची आहे. त्यामुळे काही घडल्यास सर्व जबाबदारी संस्था, मंडळावर येते. आमच्या पथकातील गोविंदा जखमी झाला, हे शल्य आजही मनात आहे, अशी खंत अध्यक्ष शेट्ये व्यक्त केली. कृष्णजन्म रात्री १२ वाजता होतो आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजे गोविंदा काढण्याची पद्धत होती. बरीच लोक त्यांचा गैरफायदा घेत होते, आम्ही त्या पद्धतीने कधीच विचार केला नाही. त्यामुळेच आम्ही यशस्वी झालो. गोविंदा पथकांनी पैशाचा मोह, थरांच्या स्पर्धेत उतरू नये. गोविंदांना दुखापत होणार नाही, याची काळजी घेऊन गोविंदा काढावा, असे आवाहन गोविंदा पथकाचे अध्यक्ष शेट्ये यांनी केले आहे.
हेही वाचा Dahihandi शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची दहीहंडी
हेही वाचा National Anthem In Nagpur तृतीयपंथींनी एकत्र येऊन केले राष्ट्रगीत गायन