मुंबई - लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर ( Amit Shah Mumbai Visit ) होते. परंतु या दौऱ्यात त्यांनी लालबागच्या राजासहित, वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या मंडळाचा गणपती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्याच बरोबर मेघदूत या बंगल्यात झालेल्या बैठकीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना बुस्टर डोस दिला आहे.
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शाह यांनी मेघदूत या ( Amit Shah BJP meeting in Mumbai ) बंगल्यावर दुपारी १२ ते २ या दरम्यान झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना पूर्णपणे कामाला लागायच्या सूचना देत टार्गेट १५० दिले आहे. विशेष करून सध्याच्या राजकीय वातावरणात ज्या पद्धतीने शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. ते पाहता या सर्व गोष्टींपासून दूर राहत जनतेमध्ये मिसळून त्यांची कामे करण्याचा संदेशही अमित शाह ( BJPs target Mission Mumbai ) यांनी दिला आहे.
टार्गेट मिशन मुंबई लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. परंतु या दौऱ्यात त्यांनी लालबागच्या राजासहित, वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या मंडळाचा गणपती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्याच बरोबर मेघदूत या बंगल्यात झालेल्या बैठकीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना बुस्टर डोस दिला आहे. विशेष करून मेघदूत या बंगल्यावर दुपारी १२ ते २ या दरम्यान झालेल्या बैठकीत अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना पूर्णपणे कामाला लागायच्या सूचना देत टार्गेट १५० दिले आहे. विशेष करून सध्याच्या राजकीय वातावरणात ज्या पद्धतीने शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे ते पाहता या सर्व गोष्टींपासून दूर राहत जनतेमध्ये मिसळून त्यांची कामे करण्याचा संदेशही अमित शहा यांनी दिला आहे.
कार्यकर्त्यांनी कामाला लागा कुठलीही निवडणूक हलक्यात घेऊ नका हे स्वतः सांगणारे अमित शाह यांनी आज भाजप कार्यकर्त्यांना एक नवीन रणनीती मुंबई महानगरपालिकेसाठी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने आता भाजप नेते कामाला लागतील. भाजपच्या कोअर कमिटी बैठकीमध्ये सध्याचे राजकीय वातावरण व मुंबई महानगरपालिका निवडणूक याविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
हे पदाधिकारी होते बैठकीला उपस्थित भारतीय जनता पार्टी प्रदेश कोअर कमिटीची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी मुंबईत झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार, राज्य मंत्रिमंडळातील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा,रवींद्र चव्हाण हे ज्येष्ठ मंत्री, प्रदेश सरचिटणीस आमदार श्रीकांत भारतीय आदी मान्यवर उपस्थित होते. अमित शाह यांनी घेतलेल्या बैठकीनंतर हे नक्की आहे की, मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार, अशा विश्वास आमदार कालिदास कोळंबकर यांनी व्यक्त केला आहे.