मुंबई केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर (Amit shah Mumbai visit) आहेत. आज मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या (Bmc Election) अनुषंगाने शाहांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या मेघदूत बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी शहांनी मिशन मुंबई महापालिकेची घोषणा (Mission Bmc) केली. यावेळी, 'खयाली पुलाव'प्रमाणे शिवसेनेची अवस्था, (ShivSena Condition Is like Khyali Pulao ) अमित शाहांचा शिवसेनेवर हल्लाबोल. (Amit Shah Attack On ShivSena) यावर राम कदम, (Ram kadam) सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली.
नाट्यमय सत्तांतरानंतर अमित शहांचा पहिलाचं दौरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या निमित्ताने मुंबईत जरी आले असले तरी त्यांनी मुख्य म्हणजे भाजप कार्यकर्ते, माजी नगरसेवक, आमदार व नेत्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या शेजारी असलेल्या मेघदूत या बंगल्यात संवाद साधला. मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाची अशी बैठक होती. कारण राज्यात नाट्यमय सत्तांतरानंतर अस्तित्वात आलेल्या शिंदे - फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt) नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा पहिलाच दौरा होता. याप्रसंगी बोलताना अमित शाह यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेने २०१४ मध्ये दोन सीटसाठी युती तोडली असं सांगत शिवसेना स्वतःच्या निर्णयामुळे छोटी झाली असल्यासही ते म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेची अवस्था आता खयाली पुलावाप्रमाणे (ShivSena Condition Is like Khyali Pulao) झाली असल्याचेही त्यांनी सांगितलं असून आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केला नाही तर त्यांची वाहतात त्यांनी स्वतःच लावली आहे असेही ते म्हणाले आहेत.
अभी नही तो कभी नही याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडवणीस यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करायला सांगितले आहे. मुंबई महानगरपालिकेवर "अभी नही तो कभी नही" असं सांगत कुठल्याही परिस्थितीत भाजपचा भगवा फडकवावाच लागेल व त्यासाठी जोमाने कामाला लागा, रस्त्यावर उतरा असेही त्यांनी सांगितले आहे. इतर कुठल्याही गोष्टीवर लक्ष देऊ नका तर जनतेत जाऊन जनतेची काम करा असेही त्यांनी सांगितले.
अमित शाह निवडणूकीच्या बाबतीत गंभीर (Bmc Election) गेल्या निवडणुकीत ८२ जागा जिंकणाऱ्या भाजपने आता 150 चे टारगेट समोर ठेवले आहे. त्यासाठीचा श्री गणेशा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज मेघदूत या बंगल्यावर करण्यात आला. शिंदे गटात शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपसाठी मुंबई महानगरपालिका निवडणूक थोडी सोपी जरी झाली असली तरी सुद्धा ज्या पद्धतीचे सध्या राजकीय वातावरण निर्माण झाले आहे ते पाहता मराठी मतांची सहानुभूती हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर असल्याच चित्रही निर्माण झालं आहे. म्हणूनच त्या अनुषंगाने ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी, असा मतप्रवाह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे. कारण कोणतीही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतो अशी प्रांजल बोली देणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे या निवडणुकीत दुर्लक्ष करूच शकत नाहीत. म्हणूनच, आजच्या शहांच्या भाषणाने कार्यकर्त्यांना एक नवीन स्फूर्ती भेटली असल्याचं भाजप नेते राम कदम तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितला आहे.