ETV Bharat / city

Nana Patole On PM Security Breach : पंतप्रधानाच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे : नाना पटोले - शेतकरी आंदोलनातील मृत्यू

पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी असणारी एसपीजी ( Special Protection Group ) गृहखात्याच्या अखत्यारीत येते. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीबाबाबत गृह खातेच जबाबदार ( Home Ministry Responsible For PM Security Breach ) असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला ( Nana Patole On PM Security Breach )आहे.

नाना पटोले
नाना पटोले
author img

By

Published : Jan 6, 2022, 9:01 PM IST

मुंबई - पंतप्रधानांचा कोणताही दौरा असला तरी १५ दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी ( Special Protection Group ) या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख ( Home Ministry Responsible For PM Security Breach ) आहेत. त्यामुळे पंतप्रधानाच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah Should Answer On PM Security Breach ) यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली ( Nana Patole On PM Security Breach ) आहे.

शेतकऱ्यांमध्ये संताप

शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, घसरलेली अर्थव्यवस्था, जीवनाश्यक वस्तूंचे वाढलेले दर, भाजपाशासित राज्यातील दलितांवरील अत्याचार यामुळे देशातील जनतेमध्ये भाजपाविरोधात प्रचंड संताप आहे. तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून पंजाबातील शेतकरी एक वर्षापासून आंदोलन करत आहेत. आंदोलनादररम्यान ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू ( Farmers Deaths In Protest ) असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळं पंजाबमधील त्यांच्या सभेला ५०० लोकंही आली नाहीत.

मोदींना सभास्थळी जायचेच नव्हते

यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आपला हवाई दौरा सोडून रोडमार्गे जायला निघाले होते. मुळात त्यांना सभास्थळी जायचेच नव्हते. त्यामुळे रूपं बदलण्यात तरबेज असणाऱ्या पंतप्रधानांनी काल आपलं एक नविन रूप दाखवून नौटंकी केली. ही बाब पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणली असून पंजाब सरकारच्या चौकशीतून 'दूध का दूध पाणी का पाणी' होईल आणि पंतप्रधान आणि भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असे पटोले म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वास घात केला

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वास घात केला. त्याला उत्तर देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले, शेतकऱ्यांना आतंकवादी, दहशतवादी आणि आंदोलनजीवी म्हणून हिणवले. पण शेतकऱ्यांनी आपला लढा सुरु ठेवला आणि हुकुमशाही वृत्तीच्या पंतप्रधानांची घमंड जिरवली. शेतकरी लढवय्या असून, तुम्हाला सत्तेवरून पायउतार करून घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही पटोले म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढळले

सत्ता गेल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Nana Patole On Chandrakant Patil ) यांचे संतुलन ढळले आहे. त्यांनी वारंवार, 'तोंड उघडायला लावू नका'चे पोकळ इशारे देण्यापेक्षा एकदा तोंड उघडावेच म्हणजे त्यांच्या तोंडात किती हवा आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळेल, असा टोला लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.