ETV Bharat / city

Amit Ghawate NCB Zonal Director : मुंबईच्या एनसीबी झोनल डायरेक्टरपदी अमिट गवाटेंची नियुक्ती

समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांच्यानंतर इंदूरचे झोनल डायरेक्टर ब्रिजेंद्र चौधरी यांच्याकडे मुंबई झोनल अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यात आता मुंबई एनसीबी झोनल डायरेक्टर पदी अमित गवाटे यांची नियुक्ती करण्यात आली ( Amit Ghawate NCB Zonal Director ) आहे.

NCB
NCB
author img

By

Published : Apr 14, 2022, 4:54 PM IST

मुंबई - समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांच्यानंतर इंदूरचे झोनल डायरेक्टर ब्रिजेंद्र चौधरी यांच्याकडे मुंबई झोनल अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. या पदावर कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात आता मुंबई एनसीबी झोनल डायरेक्टर पदी अमित गवाटे यांची नियुक्ती करण्यात आली ( Amit Ghawate NCB Zonal Director ) आहे.

एनसीबी मध्ये आयआरएस अधिकारी असलेल्या समीर वानखेडेंची मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झाली. त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, तसे झाले नाही. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाच्या तपासामुळे समीर वानखेडे प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर आर्यन खानच्या अटकेनंतर ते सतत चर्चेत होते. मध्यंतरी ते वादाच्या भोवऱ्यातही अडकले.

यादरम्यान, झोनल डायरेक्टरचा अतिरिक्त कार्यभार ब्रिजेंद्र चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्या जागी आता अमित गवाटे यांची नियुक्ती झाली आहे. समीर वानखेडे डेप्युटेशनवर सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीच्या मुंबई कार्यालयात रुजू झाले होते. ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या कालावधीत समीर वानखेडे यांनी 96 जणांना अटक करत 28 केसेस दाखल केल्या. तर 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक करत 117 केसेस दाखल केल्या आहेत. वानखेडे यांनी त्यांच्या काळात 1 हजार कोटी रुपयांचं 1791 किलो ड्रग्ज जप्त केले तर काही संपत्ती देखील जप्त केली.

कोण आहे अमित घावटे? - 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी अमित घावटे एनसीबीच्या मुंबई विभागाचे नवे झोनल डायरेक्टर असणार आहेत. त्यांच्याकडे बंगळुरु झोनल युनिटचा अतिरिक्त कार्यभार देखील असणार आहे.

हेही वाचा - Chitra Wagh Notice : चित्रा वाघांच्या अडचणीत वाढ; रघुनाथ कुचिकांना पाठवली 10 कोटींची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.